लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हा पदाधिकारी जाहीर जिल्हाध्यक्षपदी डॉ.काशीनाथ राजे तर जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील






लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हा पदाधिकारी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी डॉ.काशीनाथ राजे तर जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील

लातूर ः लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हा तसेच लातूर तालुका व लातूर शहर पदाधिकार्‍यांच्या निवडी आज दिनांक 21 जून 2020 रोजी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी लातूर येथे झालेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत जाहीर केली.



त्यात जिल्हाध्यक्षपदी डॉ.काशीनाथ गुरूप्पा राजे तर जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी लिंगायत महासंघ ही महाराष्ट्रव्यापी संघटना असून लिंगायत समाजाच्या प्रश्‍नांनसाठी व विकासासाठी झटणारी एक चळवळ आहे. लातूर जिल्ह्यात ही संघटना अग्रक्रमाने काम करीत आहे. या संघटनेत काम करण्याची अनेकजण इच्दुक आहेत. व अनेकांना विविध पदावर जाण्याची संधी त्याच्या क्षमतेनुसार येथे दिली जाते. या नियुक्त्या एक वर्षासाठी असतात. आज 21 जून रोजी लिंगायत महासंघाचे प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत लातूर जिल्हा पदाधिकार्‍यांच्या निवडी प्रा.सुदर्शन बिरादार यांनी जाहीर केल्या. जिल्हाध्यक्षपदी माजी प्राचार्य डॉ.काशिनाथ राजे यांची तर जिल्हासंघटकपदी नागनाथप्पा भुरके यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजी भातमोडे, प्राचार्य शिवाजी मुळे, गोरोबाकाका शिवणे, सिद्रामप्पा पोपडे, काशिनाथ मोरखंडे, तानाजी पाटील भडीकर, दिलीप सोलगे, माधव मल्लेशे यांची तर सहसचिवपदी माणिकअप्पा कोकणे, विश्‍वनाथअप्पा मिटकरी, जी.जी.ब्रम्हवाले, नवनाथ डोंगरे, विजयकुमार कुडूंबले, बाबुराव मुक्तापूरे, विश्‍वंभर हिंगणे, राजेश्‍वर हुडगे यांची निवड करण्यात आली असून कोषाध्यक्षपदी माणिक मरळे यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी रमेशअप्पा वेरूळे, सुर्यकांत थोटे, शिवदास लोहारे, शंकर पाटील चिगळीकर, विश्‍वनाथ स्वामी, विश्‍वनाथ बिरादार, शरण पाटील, संगय्या स्वामी, प्रा.बी.एस.पळसकर, कावळे तुकाराम, पांडूरंग तोडकर, जयराज बेलूरे यांची निवड करण्यात आली.
तसेच लातूर तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत झुंजारे तर सरचिटणीसपदी विजयमुर्ती बिडवे यांची निवड करण्यात आली.
जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या व डॉ.शिवलिंग शिवाचार्य यांच्या आशिर्वादाने जिल्हा मार्गदर्शक म्हणून शांतवीर शिवाचार्य महाराज औसा, शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, विजयकुमार मुरगे, राजेंद्र शिवाचार्य महाराज कासारशिरसी, शंकरलिंग शिवाचार्य शिरूर अनंतपाळ, बसवलिंग शिवाचार्य महाराज देवणी तसेच गहिणीनाथ महाराज औसेकर, भगवंतराव पाटील चांभरगेकर तसेच जिल्ह्यातील काही मान्यवर मंडळीस मार्गदर्शक म्हणूनही सल्ला घेण्याचे यावेळी ठरले. त्यात मल्लिकार्जुन मानकरी, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, विश्‍वनाथ वलांडे गुरूजी, चन्नप्पा मुदगडे, अ‍ॅड.सांबप्पा गिरवलकर, डी.बी.लोहारे, काशीनाथप्पा निजवंते, शिवाजी रेशमे, डॉ.शंकर पडसलगी, अण्णासाहेब पाटील वडवळकर, राम बुद्रे नळेगाव, अ‍ॅड.मुक्तेश्‍वर वागदरे औसा आदिंची मार्गदर्शक म्हणून निवडकरण्यात आली असल्याचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या