........... मराठा आरक्षणाचा यशस्वी लढा...........
कालचा MPSC चा निकाल आणि मराठा समाज......
सर्वांना मानाचा जय जिजाऊ 🙏🌹🚩
काल एमपीससी चा निकाल लागला आणि मराठा समाजातील अनेक तरुण ,तरुणी यांनी घवघवीत यश संपादन केल वाचून मनाला खूप समाधान वाटलं निकाल अगोदर ही लागत होता पण मराठा समाजच त्यात असलेलं प्रमाण हे नगण्य होत पण कालच निकाल त्या मानाने खूप छान आहे आणि याचे कारण म्हणजे मराठा समाजाला मिळालेला आरक्षणाचा अधिकार आणि त्याचा फायदा लेकरांनी उचलला खूप अभिमानस्पद आहे
मन भूतकाळात गेले मराठा आरक्षण विषय एकदम नजरेत आला आणि खेडेकर साहेबांचे उपकार कोणत्या शब्दात व्यक्त करावेत यासाठी शब्द शिल्लक नाहीत याचे कारण ही तसेच
सुरुवातीच्या काळात पंजाब राव देशमुख ,आणि त्यांच्या सारख्या अनेक नेत्यांनी मराठा आरक्षण लढा चालवला पण त्याकाळी मराठा समाजाने त्यांना प्रतिसाद देणे तर सोडा अपमानास्पद वागणूक दिली
1सप्टेंबर 1990ला मराठा सेवा संघाची स्थापना मा.खेडेकर साहेबानी केली पहिल्यांदा १०० ते १५० लोक घेऊन स्थापन झालेला मराठा सेवा संघ आज वटवृक्ष झालेला आपण पाहता
आणि आरक्षण चा मुद्दा साहेबानी पुन्हा अभ्यास पूर्ण मांडणी करून समाजा समोर आणला सेवा संघाचे अनेक कक्ष स्थापन केले
आणि आरक्षण साठी संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड या कक्षाला आरक्षणाच्या लढ्यात उतरण्यासाठी साहेबानी जीवाचे रान केले संभाजी ब्रिगेड चे तरुण खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन अख्या महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडने पेटवून उठवला मराठा आरक्षणाचा मुद्दाने सर्व महाराष्ट्र ढवळून काढला आंदोलन ,रास्ता रोको ,घेराव घालणे निवेदन देणे असे अनेक मार्गांनी लेकरं लढत राहिली अनेक मुलांवर केसेस झाल्या तरुण पोर जेल मध्ये गेले केसेस झाल्या
जिजाऊ ब्रिगेड ही सेवा संघाचाच कक्ष मराठा महिलांचा इतिहास किती जाज्वल्य आहे हे साहेबानी आपल्या पुस्तकातून, लिखाणातून भाषणातून पुन्हा पुन्हा मांडले आणि ज्या मराठा समाजाच्या महिला मधल्या काळातील काही घडामोडीने घराच्या उंबरठ्याच्या आता होत्या त्या अक्षरशः रस्त्यावर उतरल्या मराठा अरक्षणासाठी मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड,व सर्व मराठा संघटना,५८ मराठा क्रांती मोर्चे निघाले साहेबांचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावेत हेच कळत नाही त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र भर जिजाऊ ब्रिगेड ने आंदोलन केले ,जिजाऊ ब्रिगेड मा. प्रदेश अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांच्या नेतृवा खाली माजी मंत्री हर्षवर्धन पाटलाचा बंगला हायजॅक केला तेंव्हा साहेब आजाद मैदानावर स्वतः 7 दिवस बसून होते 200 ते 250 मराठा समाजच्या महिला आजाद मैदानावर 7 दिवस धरणे आंदोलन करीत होत्या आणि या सर्वांना बळ फॅक्ट आपले साहेब आपल्या सोबत आहेत हा ठाम विश्वास होता कोणत्याही महिलेच्या घरचे पुरुष सोबत नव्हते पण त्या सर्वजणी एव्हढ्या आत्मविश्वासाने तिथं होत्या त्याच पूर्ण श्रेय साहेबांना जात मराठा सेवा संघाने शिवरायांची स्त्री प्रति असलेली भावना खूप आदराने जपलेली आहे त्यामुळे जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची संघटना आज ही तेवढ्याच विश्वासाने आणि अभिमाने काम करीत आहे
सेवासंघ ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्ष सुरुवाती पासून जिजाऊ रथ यात्रा आणि अनेक भाषणे व्याख्याने या माध्यमातून आरक्षणासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि आणखीन करत आहे
त्या नंतर आरक्षनाचा लढा लोक लढा झाला आणि समाजातील अनेक संघटनेने तो मुद्दा हाती घेतला नंतर लाखोंचे मोर्चे निघाले आणि हो नाही करत आरक्षण मराठ्यांच्या पदरात पडलं नंतर ही याचिका दाखल झाल्या पण अभ्यास पूर्ण मांडणी करून मागास आयोगाने ते पुन्हा कोर्टात मांडलं आणि ते टिकवल मागासवर्गीय आयोगाचे गायकवाड सर यांनी ही आरक्षनाची बाजू मांडली त्यासाठी समजतील जे काही निकष आहेत ते सर्व जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी आदरणीय कामाजी पवार साहेबांच्या मार्गदर्शना खाली मागासवर्गीय आयोगाला सादर केले आम्ही सर्वजण मुंबई ला जाऊन अहवाल सादर केला आणि आरक्षण पदरात पडले अनेक तरुण तरुणी कालच्या निकालात यशस्वी झाल्या याना ही माहीत आहे आरक्षण मिळाले त्याचा फायदा झाला पण हे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा सेवा संघ साहेबांच्या मार्गदर्शनाने कसा लढला ही गोष्ट जावी तशी समाजासमोर गेली नाही खेड्यापाड्यात ही गेली नाही असे अनेक काम जे मराठा सेवा संघाने केवळ समाज उंन्नती प्रगती डोळ्यासमोर ठेवून केले आहेत हे सर्व सर्वांना माहीत होणे गरजेचे आहे
शेवटी एवढेच लिहिलं जे तरुण तरुणी वाघ वाघिणी नि काल यश मिळवले आहे त्यांनी त्या पदावर राहून आपल्या समाजासाठी काम करावे एवढी विनंती🙏🚩🙏
मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटना यांचा आरक्षणाचा लढासुवर्ण अक्षरात लिहिला जाईल आरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना भावपुर्ण शिवांजली अर्पण 🌹🌹🌹🌹🌹
जय जिजाऊ जय शिवराय।
एक मराठा लाख मराठा।।
लेखक
गोविंदराव निकम
संपादक सा. मराठा वादळ
लातूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.