शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन
लातूर, दि.25(जिमाका):- जिल्हा प्रशासनामार्फत यापूर्वीच शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेण्यासाठी गुगल डॉग फॉर्म वर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु अजूनही काही शेतकऱ्यांनी यावर अर्ज केलेला नाही. तरी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज उपलब्ध झालेले नाही त्या शेतकऱ्यांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या google.doc फॉर्मवर तात्काळ अर्ज करावा म्हणजे प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेकडे पाठपुरावा करून त्वरित त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करण्याची कार्यवाही करणे सोयीचे होईल.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकामार्फत मार्फत आजपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून दिले नाही त्या शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांना https://forms.gle/Z1rayfhoPEyCTCqF9 नवीन पीक कर्ज घ्यायचे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी गुगल डॉक फॉर्म वर ऑनलाईन अर्ज भरावा. त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन पीक कर्जासाठी अर्ज करावा असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.