ग्रीन लातूर वृक्ष टिम , आयएमए, वुमन्स डॉक्टर विंग, पशु वैद्यकिय सर्व चिकित्सालय
यांच्या वतीने मियावाकी पध्दतीने २४० झाडांचे रोपण.
शहरातील नागरिक आणि झाडांचे गुणोत्तर हे झपाट्याने कमी होतंय. एका माणसामागे सात झाडे असं प्रमाण असण्याची गरज असताना पाच झाडांमागे एक माणूस इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरीकरण झपाट्याने वेग घेतंय...टोलेजंग इमारती उभ्या राहतायत.. मोठमोठे हायवे होत आहेत, सिमेंटची जंगले उभी राहत आहेत, पण यासर्वांच्या जागेवर असलेली झाडे गेली कुठे ? आधीच इथे जागेची अडचण..त्यात झाडं कुठे लावायची असा नाराजीचा सूर आपण आळवतो.. पण मियावाकी ही झाडे लावण्याची अशी पद्धत आहे जिथे कमी जागेत जंगल निर्माण होऊ शकते...उदाहारणार्थ जिथे सहा चारचाकी गाड्या उभ्या राहतात इतक्या लहान ठिकाणात 300 विविध प्रकारची झाडे लावली जाऊ शकतात.
याप्रमाणे आज ग्रीन लातूर वृक्ष टिम , इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर, वुमन्स डॉक्टर विंग, पशू वैद्यकिय सर्व चिकित्सालय यांनी एकत्रितपणे पशू वैद्यकीय रुग्णालय, शाम नगर येथे २४० वनस्पतींच्या रोपे लावली. यामध्ये वड, चिंच, पळ्स, जांभूळ, बांबू, सिताफळ, कडुनिंब, शिसम,कांचनार ही झाडे लावली.
वाढतं शहरीकरणामुळे पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी कमी जागेत जास्त वनस्पतींची लागवड करुन २०२० मधील हे पहिले मियावाकी जंगल उभारलं जात असल्याचे ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा यांनी सांगितले. यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी, वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉ. अनुजा कुलकर्णी, पशूवैद्यकिय चिकित्सालयाचे डॉ. नानासाहेब कदम, एस.टी. महामंडळ चे विभागिय अधिक्षक सचिन क्षीरसागर, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डॉ. बी.आर.पाटील, डॉ. रचना जाजू, डॉ. सौ. सविता काळगे, डॉ. सौ. अंजली कवठाळे, डॉ. सौ. वारद, श्री महेबूब पटेल, डॉ. भास्कर बोरगावकर, पद्माकर बागल, प्रमोद निपानीकर हे उपस्थित होते. यावेळेस मनमोहन डागा, रुषिकेश दरेकर, गंगाधर पवार, सुहास पाटील, जफर शेख, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, मिर्झा मोईझ, सुलेखा कारेपुरकर, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार, डॉ. मुश्ताक सय्यद, पुजा निचळे, प्रफुल्ल पाटिल, सौ. धर्माधिकारी, वैभव डोळे, आशिष सुर्यवंशी यांनी झाडे आणणे, खड्डे खोदणे, झाडे लावणे, झाडांना काठ्या बांधणे, झाडांना पाणी देणे याकरीता परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.