कासार सिरसी मंडळातील जनतेला दिलेल्या वचन पूर्तीचे भूमिपूजन





*कासार सिरसी मंडळातील जनतेला दिलेल्या वचन पूर्तीचे भूमिपूजन!*
औसा.मुख्तार मणियार
 आज कासार सिरसी येथील सुसज्ज बसस्थानकाचेभूमिपूजन केले. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत मतदारसंघातील औसा आणि कासार सिरसी अशा २ बसस्थानकांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. या दोन्ही बसस्थानकाच्या बांधकामांसाठी जवळपास १० कोटींचा निधी खर्च होणार आहे. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना भौगोलिक परिस्थितीमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा निश्चय व्यक्त करून कासार सिरसी - कोराळी वाडी रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवली जावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

 या कार्यक्रमाला भाजप कासार सिरसी मंडळाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वाकडे, पं. स. सदस्य श्री जिलानी बागवान, श्री नारायण इंगळे, श्री नितीन पाटील, भाजप कासार सिरसी मंडळ सरचिटणीस श्री श्री धनराज होळकुंदे, सरपंच श्री रामलिंग होगाडे, सौ कल्पनाताई गायकवाड़, श्री ओम बिराजदार, श्री नाना धुमाळ, श्री बालाजी बिराजदार, सरपंच श्री पंडित फूलसुरे, श्री मयूर गुबूरे, श्री विजय सुरवसे, डॉ नितीन व्यवहारे, डॉ दीपक नागदे, श्री व्यंकट माने, श्री महेश होळकुंदे,श्री परमेश्वर बिराजदार, सरपंच श्री बळवंत पाटील, श्री किरण किवडे, श्री नारायण डोंबाळे, परिवहन महामंडळाचे अधिकारी श्री राजगीरे,‌ श्री कोकाटे, श्री दाते व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या