लातूर 180 पैकी 131 निगेटिव्ह 27 पॉझिटिव्ह 15 Inconclusive व 07 रद्द






दिनांक 06.07.2020

प्रेसनोट

लातूर 180 पैकी 131 निगेटिव्ह 27 पॉझिटिव्ह 15 Inconclusive व 07 रद्द

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  69 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 48 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 12 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 08 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत व एका व्यक्तीच्या स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.

दिनांक 05.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील  02 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सर्वच 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 80 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी 35 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज 08 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.आज 48 वर्ष वय असलेल्या महिला रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व किडनीचा आजार होता व त्या मागील 45 दिवसापासून डायलिसीस वर होत्या  आज त्यांचा उपचारादरम्यान रात्री 10.00 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे  अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या