मुलांना समजुन घ्या, अपेक्षा लादू नका, पालकांनी सजग व्हावे
"ज्ञानप्रकाश' च्या पालक शाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन
तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप; भरभरून प्रतिसाद
लातूरदि.२७(प्रतिनिधी)ः सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार ही आजच्या काळाची ज्वलंत गरज व चिंतनीय बाब आहे. आपल्या मुलांनी केवळ इंजिनिअर-डॉक्टर बनावे असा अट्टाहास धरू नका. पाल्यांवर पालकांनी अपेक्षा लादू नका. त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, मुलांना समजुन घ्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी पालकांना केले.
शिक्षणात नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारी संस्था म्हणून परिचित असणार्या लातूरातील ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाने लॉकडाऊन काळात पालकांसाठी झुम मिटिंगद्वारे
‘21 व्या शतकातील बदलत्या शिक्षणात पालकांची भुमिका’
या विषयावरील तीन दिवसीय पालकांची शाळा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर निलेश घुगे, अक्षय नंदकुमार, शाम मकरंमपुरे यांनी पालकांशी संवाद साधत त्यांना सजग पालकत्वाचे धडे दिले.
बहुतांश पालकांनी आपली मुले इंजिनिअर, डॉक्टर व्हावे, त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेवून आयटी क्षेत्रात चमकावे, गलेलट्ट पॅकेज मिळविण्यासाठी परदेशी जावे... आदि अपेक्षा व्यक्त करतात. या संदर्भात बोलतांना नंदकुमार म्हणाले की, सगळ्या मुलांनी आपल्या पालकांच्या अपेक्षा पुर्ण करायच्या ठरवल्या तर मग इतर क्षेत्राचे काय? तुमची मुले ही देशाची मुले आहेत, ते देशाचे नागरिक आहेत, त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार घडू द्या, फुलू दया, करीअर करू द्या, त्यांच्यावर प्रेम करा. ते पालकांच्या प्रेमाला भुकेले आहेत. असे जर झाले तर भारत देश सुजलाम-सुफलाम व्हायला अवधी लागणार नाही. विश्व गुरू म्हणून नावारूपाला द्यायचे असेल तर मुलांना विकसित होवू द्या! त्यांना घडू द्या... त्यांना हवे ते क्षेत्र निवडण्याची संधी द्या...!
महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर हजारों शिक्षक-विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे मास्टर ट्रेनर निलेश घुगे यांनी या कार्यशाळेत तीन दिवस अनेक किस्से, अनुभव, गोष्टी, प्रसंग सांगत ‘पालकांची शाळा’ रंजक करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करीत त्यांनी सोप्या पध्दतीने पालकांना मार्गदर्शन करीत त्यांची मने जिंकली.
मुलांच्या भविष्यासंदर्भात कांही टिप्स देतांना निलेश घुगे म्हणाले की, आपला मुलगा यशस्वी व्हावा असे जर प्रत्येक पालकांना वाटत असेल तर, बालपणापासूनच सुरूवात करायला हवी. मुलांच्या जिज्ञासूवृत्तीचा सन्मान करायला पालकांना शिकले पाहिजे. पालकांनी किती सहज रहावे... हा पण एक चिंतनीय भाग आहे. माझं मुल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवत असतांना त्यांनी माझ्या सारखं व्हावं हा अट्टाहास पालकांनी धरू नये, परंतु आज सर्वोतोपरी असेच दिसून येते की, माझ्या मुलाने किंवा मुलीने शिकून खुप मोठे व्हावे, त्यांनी खुप मोठे करीअर करावे, त्यांचे चोहीकडे नाव व्हावे. एकंदरीत सजग पालकत्व म्हणजेच मुलाना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजून घेणे, त्याचे अस्तित्व त्याला निर्माण करू देणे. हे करत असतांना त्याला जोड द्यावी ती आपल्या सजग पालकत्वाची!
ते पुढे बोलतांना म्हणाले, मुलं अनुभवातून शिकत नसतात. चिंतन आणि मननातून ते शिकत असतात. घोंडपट्टी करणे, उजळणी करणे, सतत लिहून काढणे. झाला अभ्यास म्हणत नसतात. एखाद्या गोष्टीचे चिंतन करणे, मनन करणे आणि यातून काय समजले ते लिहून काढणे म्हणजे अभ्यास होय! मुलांशी सतत बोलत रहाणे. हे देखील तितकेच महत्वाचे आहे. संवाद हा पालकत्वाचा बेस्ट मार्ग आहे. मुलांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. त्याच्या आवडी-निवडी जाणा!
प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले की, उत्तमतेचा ध्यास हेच ज्ञानप्रकाश शिक्षण प्रकल्पाचे ब्रीद आहे. आम्ही मुलांवर कुठलीही गोष्ट लादत नाही. हसत-खेळत, आनंददायी शिक्षण देण्यावर संस्थेचा भर आहे. प्रात्यक्षिक, प्रासंगीक सण-उत्सव, सहली, मान्यवरांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे प्रशिक्षण यामुळेच गेल्या 20 वर्षात ज्ञानप्रकाशने शिक्षण क्षेत्रात वेगळेपण निर्माण करून पालकांचा विश्वास संपादन केला आहे. प्रयोगशील शाळा म्हणून हा ‘ज्ञानप्रकाश’ प्रकाशझोतात आली आहे.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संचालिका सविता नरहरे, अशोक गुरदळे यांच्यासह शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी प्रयत्न केले. तीन दिवसीय या कार्यशाळेत जवळपास 700 पालकांनी सहभाग नोंदवला. सुजाता कुलकर्णी, गोविंद लाडे, डॉ.पवन लड्डा, सुखदा कुलकर्णी, माधुरी दंडिमे, नंदिनी कुलकर्णी, सुधीर नलवाड, वर्षा देवशटवार आदि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.