मानसाच्या स्वैर मन आणि वर्तनाला पायबंध असलाच पाहिजे: गुरुबाबा महाराज औसेकर
औसा प्रतिनिधी
औसा येथील श्री नाथ मंदिरात श्रावणमास अनुष्ठानात प्रासादिक चक्री भजनानंतर श्री ज्ञानेश्वरी वरील निरुपणात महाराज बोलत होते.
तेराव्या अध्यायातील
इंद्रीय विषयाचे भेटी!सरशीय जे गा उठी!
कामाची बहुटी,धरोनिया!
जिथे वृत्तीयीचा आवडी!बुध्दी होय वेडी!
विषया जिया गोडी!ते गा इच्छा!!
या ओबीनरु चिंतनात गुरुबाबा महाराज औसेकर म्हणतात,मन विकल्पाने ग्रस्त झाले,की ते बुध्दी ज्ञानाचे ऐकत नाही ते विषयाकडे धाव घेते,जसे हिरवा चारा पाहिल्यावर जनावर धाव घेते,येथे या मनाला आवरले पाहिजे,या संदर्भात दृष्टांत देताना...एक शेळी असते,मालक गड्याला म्हणतो..हिचे स्वैर हिंडुन चरणे थांबेच,शेळी थांबत नाही, तुटुन पडते,तेव्हा गडी काठीने तोंडावर हाणतो,तेव्हा कुठे शेळी तोंड बाजूला घेऊन चरणे थांबवते दृष्टांत संपला, मतितार्थ पूर्वी अनुभवलेले भोग वस्तु विषयी आठवण ओढ,मोह जागृत होऊन ती पुन्हा भोगण्याची जी अपेक्षा त्याला इच्छा म्हणतात.भलेभल्यांना या स्वैर मनाने विषयाने ग्रासुन संपवले आहे.इंद्रीय आणि विषय एकत्र येऊन काम लालसा उत्पन्न झाल्याने नावाजलेले ज्ञानी म्हणवणारे देखील वहात गेल्याची अनेक उदाहरणे आहेत,असे बांबानी स्पष्ट केले.आपण मनाला नियंत्रित ठेवणे करीताच नाम सेवा, साधना, अनुष्ठान नित्यनेम हा मोलाचा असलेले सांगितले.माणसाच्या मनाला वेळेवर आवर घालावाच लागतो.यावर एक सुभाषितांचा संदर्भ देताना गुरुबाबा महाराज म्हणतात.
लालयेत पंचवर्षनी,दश वर्षानी ताडयेत,
प्रापते तु थोडष वर्ष,पत्रम मित्र वंदाचरे.
म्हणजेच सांगणे शिकविणे यालाही मर्यादा असतात हे येथे महत्वाचे ठरते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.