हिंगोली तालूक्यातील पडेगाव येथील सारीच्या आजाराने भरती असलेल्या एका 60 वर्षीय पुरुषास कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवालातून स्पष्ट झाले आहे





हिंगोली जिला वार्ता 
जिल्ह्यात नवीन 14 रुग्ण ; 51 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,दि.9: इमामोदीन शैख़  जिल्हा रुग्णालय, हिंगोली  येथील आयसोलेशन वार्ड हिंगोली तालूक्यातील पडेगाव येथील  सारीच्या आजाराने भरती असलेल्या एका 60 वर्षीय पुरुषास कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवालातून स्पष्ट झाले आहे.
तसेच हिंगोली येथील अंधारवाडी क्वारंटाईन सेंटर येथे हिंगोलीतील तालाब कट्टा परिसरातील रहिवासी  एका 32 वर्षीय महिला आणि एक वर्षीय मुलाला कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही रुग्ण तालाब कट्टा  येथील कोविड-19 महिला रुग्ण जी नांदेड येथे उपचाराकरीता भरती आहे तिच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील दौड गावातील 25 वर्षीय प्रसुती पश्चात महिला व एक 50 वर्षीय महिला यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही महिला या औरंगाबाद येथून गावाकडे परतलेल्या आहेत. लिंबाळा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये 6 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कळमनुरी येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये शेवाळा गावातील 2 महिन्याच्या मुलीला कोविड-19 ची लागण झाली आहे. तर सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटर येथे वैतागवाडी गावातील (प्रा.आ. केंद्र, कौठा), 45 वर्षीय पुरुष आणि 14 वर्षीय मुलाला कोविड-19 ची लागण झाली आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबई मधून गावाकडे परतले आहेत. यानुसार आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 14 नव्याने कोविड-19 रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 314 रुग्ण झाले आहेत, त्यापैकी 263 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला एकूण 51 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे 10 कोविड-19 रुग्ण(1 रिसालाबाजार, 1 मकोडी, 2 बहिर्जी नगर, 2 गांधी चौक, 1 जी.एम.सी. नांदेड, 1 पेडगाव, 2 शुक्रवार पेठ) तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये 9 कोविड-19 रुग्ण (1 वसमत शहर, 2 बहिर्जी नगर, 1 गणेश नगर, 1 दर्गापेठ, 1 रिधोरा, 2 टाकळगाव, 1 जय नगर), येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकूण 8 कोविड-19 रुग्ण (1 बाभळी, 2 विकास नगर, 3 नवी चिखली, 1 डिग्रस, 1 शेवाळा) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भती आहेत.  कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत 15 कोविड-19 चे रुग्ण (3 तालाबकट्टा, 2 केंद्रा बु., 1 प्रगती नगर हिंगोली, 3 भांडेगाव, 1 पिंपळखुटा, 1 हनवतखेडा, 4 कळमकोंडा) उपचारासाठी भरती आहेत. कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे 3 कोविड-19 चे रुग्ण (1 केंद्रा बु, 2 वैतागवाडी ) उपचारासाठी भरती आहे. तर क्वारंटाईन सेंटर औंढा नागनाथ येथे 6 कोविड-19 चे रुग्ण (2 औंढा नागनाथ, 2 भोसी, 2 दौडगाव) उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सद्य:स्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 5436 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 4904 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 4622 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 803 व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी 249 अहवाल येणे/ थ्रोट स्वॅब घेणे प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाचे विकार, कॅन्सर इ. दुर्धर आजार आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच काही त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्र (सामुदाय आरोग्य अधिकारी मार्फत), प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे, तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईल वर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणांस सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते.
****
                                                            
 
कोरोना रुग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्हा राज्यात सर्वप्रथम
 
हिंगोली,दि.9: जिल्ह्यात आज रोजीपर्यंत कोरोनाची 314 व्यक्तींना लागण झाली असून त्यापैकी 263 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच व आज रोजी 51 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती चांगली आहे. संचालक आरोग्य सेवा पूणे यांच्या अहवालानुसार हिंगोली जिल्हा कोरोना  विषाणूजन्य आजाराचे बाधीत रुग्ण बरे होण्यामध्ये (Recovery Rate ) महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आला आहे. ही  जिल्ह्याकरीता अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तसेच मृत्यूच्या दरामध्ये देखील हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये  शेवटच्या तिसऱ्या क्रमांकावर असून, जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण हे केवळ 0.3 एवढे आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचे रुग्णांच्या संख्येमध्ये दुप्पट होण्याचे प्रमाण हे 42 दिवसानंतरचे आहे
जिल्ह्यात परदेशातून, परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून 14 मार्च पासून 47 हजार 766 नागरिक आले आहे. या आलेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचेमार्फत पुर्वनियोजन करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर ज्यांना कोरोनाची चिन्हे, लक्षणे आढळून आली त्यांना शासकीय क्वारंटाईन करुन त्या व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेवून वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे पाठविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील 1 हजार 008 आशा स्वयंसेविका, 37 गट प्रवर्तक, 1 हजार 214 अंगणवाडी कार्यकर्त्या, 503 आरोग्य कर्मचारी, 119 समुदाय आरोग्य अधिकारी, 64 वैद्यकीय आरोग्य अधिकारी व 5 तालुका आरोग्य अधिकारी या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार यांच्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विषाणूजन्य आजाराची कोरोना विषाणूबाबत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती करत आरोग्य शिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन आणि विविध विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रमाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या