कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 7 रुग्ण तर 2 मृत्यू
· 114 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.22: इमामोदीन शेख
जिल्ह्यात 7 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये पंचशील नगर, वसमत येथील 1 व्यक्ती, आझम कॉलनी, हिंगोली येथील 1 व्यक्ती, मंगळवारा, हिंगोली येथील 1 व्यक्ती, शिरळी ता. वसमत येथील 1 व्यक्ती, पळसगाव वसमत 1 व्यक्ती, सेनगाव येथील 1 व्यक्ती तर तोफखाना, हिंगोली येथील 1 व्यक्ती असे एकुण 7 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तसेच कोरोना केअर सेंटर, कळमनुरी अंतर्गत एकूण 4 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 7 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 2 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यान त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले असून एकूण 9 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 440 रुग्ण झाले असून त्यापैकी 323 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 114 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 3 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.