झूम मिटिंगद्वारे लातूरात भरली पालकांची शाळा
ज्ञानप्रकाश चा महाराष्ट्रातील पहिला शैक्षणिक उपक्रम
लातूर दिनांक 24 प्रतिनिधी
सध्या कोरणा विष्णूचा संसर्ग वाढल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शाळा बंद आहेत. या शैक्षणिक वर्षात शाळेची घंटा वाजलीच नाही. अशा प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या लातुरातील ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प या संस्थेने तीन दिवसाची शाळा भरवून एक अनोखा प्रयोग केला आहे. झूम मिटिंगच्या माध्यमातून पालकांना शैक्षणिक धडे देण्यात आले.
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाने आयोजित या पालक शाळेत मास्टर ट्रेनर निलेश घुगे यांनी जवळपास पाचशे पालकांशी झूम मीटिंगद्वारे संवाद साधला.
शैक्षणिक क्षेत्रातील धुरीण म्हणून ओळखले जाणारे नंदकुमार यांनी या पालक शाळेचे औपचारिक उद्घाटन केले. ,,'बदलत्या शिक्षण पद्धतीतील पालकांची व शिक्षकांची भूमिका ' या विषयावरील कार्यशाळेचा समारोप रविवार दिनांक 26 जुलै 2020 रोजी होणार आहे.
मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्रासह छत्तीसगड मधील जवळपास पंचवीस हजार शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या ट्रेनर निलेश घुगे यांनी पहिल्या दिवशी पालक व विद्यार्थ्यांना बदलत्या परिस्थितीत मुलांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शिक्षण कसे द्यायचे ? , जागतिक पातळीवर आपली मुले कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जातील ?,मुलांचे भविष्य क्षमता याचा उपयोग कसा करून घ्यायचा ? ,या तीन आयामावर मार्गदर्शन करून पालकांना सव्वा दोन तास स्क्रीनसमोर खिळवून ठेवले . अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत त्यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन करीत पालकांची मने जिंकली.
झूम मीटिंगमध्ये सहभागी होताना आई-बाबा दोघांची उपस्थिती अपेक्षित , कार्यशाळा तीन दिवस आणि पूर्णवेळ करणे आवश्यक , मीटिंगसाठी सोबत वही व पेन ठेवावी आदी सुचना शाळा गट भाग 1 व 2 अशा व्हाट्सअपद्वारे समूहातून सर्वांना देण्यात आल्या .त्यानुसार सकाळी बरोबर नऊ वाजता शाळेत वाजवली जाते तशी घंटा झुमद्वारे वाजवण्यात आली . सर्वप्रथम शाळेची प्रार्थना झाली आणि या कार्यशाळेस सुरुवात झाली.
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे प्रमुख सतीश नरहरे यांनी आपल्या छोटेखाणी प्रास्ताविकात पालकांची शाळा या अनोख्या प्रयोगा आयोजनामागची भूमिका विशद केली . . .ज्ञानप्रकाश ही प्रयोगशाळा असून विद्यार्थी व पालकांसाठी आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबवून त्यांच्याशी सतत संवाद साधत असतो ' एकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणात पालकांची भूमिका ' या विषयावरील पालकांची कार्यशाळा आयोजित करण्याचा आम्ही प्रयोग केला .लॉकडाउनच्या काळात अशा प्रकारची कार्यशाळा बहुधा महाराष्ट्रात लातूरात प्रथमच घेण्यात आली असावी.
या प्रयोगास पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले .संचालिका सौ सविता नरहरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. विशेष म्हणजे नंदकुमार यांनी आपली पत्नी लता ,मुलगा अक्षय सोबत या कार्यशाळेस पूर्ण उपस्थिती नोंदविली.
बदलत्या परिस्थितीत मुलांना कशा प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे ? ,कोणत्या माध्यमातून शिक्षणाचे धडे द्यावेत ? ,त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हाने आहेत ? ,कोरोना पासून आपण काय शिकलो ? आदीबाबत निलेश घुगे यांनी कार्यशाळेत पालकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले .पालकांनी विचारलेल्या विविधांगी प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली .बदलत्या परिस्थितीत पालकांनी काय करायचे आणि का करायचे हे सांगताना ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण म्हणजे काय ? ,ते कोठे व कसे उपलब्ध होते? हे सर्व प्रथम पालकांनी समजून घ्यायला हवे .त्यासाठी पुणे मुंबई सारख्या प्रगत शहरातील आंतरराष्ट्रीय शाळा हव्यात . आपल्या पाल्याने अशा खर्चिक शाळेत त्यात शिकले पाहिजे असा अट्टाहास धरू नये . मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे असे शिक्षण त्यांना कुठे आणि कुठल्या शाळेत होऊ शकते याचा सर्व प्रथम शोध घेतला पाहिजे.
आपल्या पाल्यांना सगळ्यात जगाने स्वीकारले पाहिजे असे व्यक्तिमत्व शिक्षण व्यवस्थेतून निर्माण करायला पाहिजे .कायम आपडेट असणारी मुले तयार करणे गरजेचे आहे नव्हे ती काळाची गरजच आहे. मुलांना कायम शिकत राहण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे . बिनकामी व कामी ( युजलेस व युजफूल ) येणारी मुले यातील फरक मुलांना समजावून सांगितला पाहिजे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.