*दिलासादायक बातमी; जनआरोग्य योजनेमुळे कोरोनावर उपचार परवडणार*
न्यूमोनियासह २० लक्षणांचा समावेश : १ कोटी ३४ लाखांची बिलं जमा
*सोलापूर :* न्यूमोनियासह कोरोनाची लक्षणे असलेल्या २० आजारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याने गरिबांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत जिल्ह्यातील १८ हॉस्पिटल असताना फक्त ७ हॉस्पिटलने दिलेले ५१४ प्रस्ताव या योजनेत मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ ५१४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात फायनल झालेल्या बिलापोटी संबंधित खासगी व सरकारी रुग्णालयांना १ कोटी ३४ कोटींचे बिल जमा करण्यात आले आहे.
*सोलापुरात १८ रुग्णालयांत सोय*
जिल्ह्यात या योजनेत समाविष्ट असलेली ४१ रुग्णालये आहेत. पण यातील फक्त १८ रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजनेतील कोविड-१९ चे रुग्ण अॅडमिट करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अकलूज: क्रिटिकल, देवडीकर, कदम, पंढरपूर: जनकल्याण, कुंभारी: अश्विनी ग्रामीण, बार्शी: जगदाळे, सोलापूर: सिव्हिल हॉस्पिटल, चिडगुपकर, गंगामाई, लोकमंगल, यशोधरा, युगंधर, अश्विनी, मार्कंडेय, धनराज गिरजी, मोनार्क, महिला, चंदन.
*या आजारांचा समावेश*
पूर्वी या योजनेत आठ आजार होते. आता कोरोना निदानासंबंधित २० बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाच्या लक्षणावरून एम ३क्यू १.३ व एम ३ क्यू १.८ चे निदान असलेल्यांना ५० हजार. एम ३ क्यू १ लक्षणे असलेल्यांना १ लाख २० हजार, एम ३ क्यू १.४ च्या रुग्णास ६५ हजार, १.५ च्या रुग्णास १ लाख, नेप्रोलॉजी: ३५ हजार, पुलमोनोलॉजी: २५ व ५० हजार अशा आठ प्रकारांचा पूर्वी समावेश होता. आता २० ते ८५ हजारांचे पॅकेज देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.