औसा नगरपालिकाचे कर्मचारी काळया फिती लावून कामकाज
औसा मुख्तार मणियार
औसा नगरपालिका क्षेत्रातील अधिकारी व विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासन नगर पालिका कर्मचाऱ्यांचा मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.औसा नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी दि.27 जुलै 2020 सोमवार रोजी काळया फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त करीत कामकाज केले.पालिका कर्मचा-यांना सेवा आयडी व जिल्हा परिषद प्रमाणे कोषागार कार्यातून पगार द्यावा,सन 2019 सालाचे थकीत सहायक अनुदान त्वरीत द्यावे,सेवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महालेखाकार नागपूर येथून पेन्शन द्यावी, सुवर्णजयंती योजनेतील कर्मचा-यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे,2000 साला पंर्यंतच्या सर्व सफाई कामगारांना समितीच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात,सातवा वेतन आयोगा प्रमाणे आश्वासित प्रगती योजना 10,20,30,चा लाभ द्यावा,स्वच्छता निरीक्षकांना राज्य संवर्गात पदस्थापना देऊन कर्मचा-यांतून मुख्याधिकारी पदासाठी 10 टक्के पदे सेवा ज्येष्ठतेनूसार भरावी, पालिका कर्मचाऱ्यांसाठी कॉलेनी देऊन घरकुलासाठी जागा उपलब्ध करावी या मागण्यासाठी दि.27 जुलै 2020 सोमवार रोजी औसा नगर परिषद कर्मचा-यांनी नगर पालिके समोर शासनाच्या काळया फिती लावून निषेध व्यक्त करीत कामकाज केले.या आंदोलनात महेमूद शेख, गणेश शिंदे,लहु जमादार,प्रदीप पाटील,मदन गुशिंगे,एम एम काझी,सचीन माळी,अकबर शेख,शिवलींग कांबळे,असद काझी,रंजना पाटील,सुनीता गवारे, अविनाश सोनवणे, वसंत बनसोडे,मारूती कसबे,इमाद काझी,किशोर हजारे, सुनील माने,प्रताप लोंढे, रघुनाथ शिंदे,एफ के हाशमी,कलावती कांबळे,हरिबाई हजारे,कमल डोळसे,लखन क्षिरसागर,गोदावरी शिंदे,मिनाबाई सातपुते, अमोल कांबळे आदि कर्मचारी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.