कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व्यापारी कामगारांची तपासणी करावी



कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व्यापारी कामगारांची तपासणी करावी
औसा मुख्तार मणियार
कोरोनाचा विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेकडून सोशल डिस्टंसिग नियमांचे पालन होत नाही, तसेच विविध व्यावसायिक आस्थापना आणि छोट्या उद्योगांच्या ठिकाणी काम करणारे कामगार व्यावसायिक आणि उद्योजकांची आरोग्य तपासणी करावी असे आदेश सहायक कामगार आयुक्त यांनी निर्गमित केले आहेत.औसा शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.छोटे उद्योग आणि व्यवसाय आस्थापनांच्या ठिकाणी कामगार मोठ्या प्रमाणात काम करतात, परंतु अशा ठिकाणी अनेक जण मास्कचा वापर करीत नाहीत.दि.15 जुलै पासून लॉकडाऊन असले तरी कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत नाही, तसेच 60 वर्षांवरील व्यापा-यांना व्यावसायिक आस्थापनाच्या ठिकाणी प्रतिबंध केला असून काही ठिकाणी त्याचे पालन होत नाही.त्यासाठीऔसा तालुक्यातील सर्व व्यापारी आणि सर्वच कामगार व उद्योजकांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.उद्योजक,व्यापारी आणि कामगारांचा ग्राहकाशी थेट संपर्क येत असल्यामुळे उद्योजक व्यापा-यांचा व कामगारांच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांना संसर्ग होऊ शकतो, त्यासाठी जनतेत कोरोना विषाणू पासून बाधा पसरु नये, म्हणून सर्व उद्योजक, व्यापारी आणि आस्थापना यांच्या ठिकाणी कामगारांची लोळिव-19 वैद्यकीय तपासणीचा त्वरीत अंमलबजावणी आरोग्य विभागाने करावी अशी मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या