पीककर्जासाठी रांग : सोशल डिस्टंसिन्गचा फज्जा


पीककर्जासाठी रांग : सोशल डिस्टंसिन्गचा फज्जा 
देगलूर ( प्रतिनिधी ) संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येत दररोज मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
आजपर्यंत शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना आता खेडोपाडी पोहचला असून ग्रामीण भागातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. 
मोतीराम तांडा, भूतंनहिप्परगा, कोटेकल्लुर, शहापूर, शेळगांव, सुगाव, मरखेल या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 
ग्रामीण भागात मात्र सोशल डिस्टंसिन्ग चा पुरता फज्जा उडाला असून बँकेमध्ये पीककर्ज उचलण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. 
माळेगाव (मक्ता ) येथील बँकेला 10 ते 12 गावे जोडली असून अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे लोकांची कामे होण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांची झुंबड पाहावयाला मिळत असून त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गर्दीवर आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या