लातूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने अवैध दारु दाखल
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील किल्लारी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांना मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार पी एस आय अमोल गुंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन औसा तालुक्यातील खरोसा येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथून देशी दारू अवैध पणे वाहतूक करुन विकणा-या दोघांना मुद्दे मालासह कारला ते मोगरगा अंतर्गत रस्तावर दि.24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता पकडले.उस्मानाबाद जिल्ह्यात देशी दारू दुकाने चालू आहेत. लातुर जिल्ह्यात मात्र पूर्णपणे दारु दुकाने बंद असल्यामुळे पिणा-यांची गैरसोयीचा व कमी काळातील जास्त कमाईचा मार्ग म्हणून खरोसा येथील आरोपी सचीन दत्ता घोडके हे 5 हजार 580 रुपयांच्या देशी दारू संत्रा लेबलच्या 93 बाटल्या व मोटारसायकल असा एकुण 45 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.आरोपी विरोधात किल्लारी पोलिस स्टेशनला कलम 65 ( अ) ( ए) 81,83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.