महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात पठाण राज्यात तिसरा
चाकूर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत चाकूर तालुक्यातील डोंग्रज येथील करीम बिस्मिल्लाखाँ पठाण याने दुसर्यांदा बाजी मारली असून विक्रीकर विभागातील कर सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे. गेल्याच आठवड्यात जाहीर झालेल्या टंकलेखन परिक्षेत आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून राज्यात मुलात पहिला आला होता तर या आठवड्यात मंगळवारी जाहीर झालेल्या अंतिम निकालात सुध्दा त्याने दैदीप्यमान यश संपादन केले असून स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. हे औचित्य साधत 23 जुलै 2020 रोजी मुस्लिम विकास परिषदेच्यावतीने करीम बिस्मिल्लाखाँ पठाण याचा सत्कार करण्यात आला. यावेळी करीम बिस्मिल्लाखाँ पठाण आई, वडील,अब्दुल समद शेख,सय्यद हारुण यांनी सन्मान केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मराठवाड्यातील लातुर जिल्ह्यातील चाकुर ता.डोंग्रज या डोंगरावर गाव वसलेले असून पठाण करीम बिस्मिल्लाखाँ यांने अत्यंत प्रतीकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केले आहे. त्याचे शालेय शिक्षण पहिली ते सातवी डोंग्रज येथे तर आठवी ते दहावी निर्मलपुरी हेर, अकरावी व बारावी शिवाजी विद्यालय उदगीर तर पदवी रायगड जिल्ह्यात केली. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण हस्तगत करण्यासाठी त्यांनी जिद्दीनं यश संपादन केले. वडील हे हातगाड्यावर फळे विकुन घर प्रपंच चालवत तर आई मोलमजुरी करते. दोन भाऊ मोठा मजुरी करतो तर लहान हा आयटी उत्तीर्ण झाला. किमान तीन एकर शेती त्यातील एक एकर विकून पठाण करीमला शिक्षणासाठी खर्च केले दोन बहीणी आहेत. खानदानात कोणीही शिकलेले नाहीत कोणताही वारसा नसतांना स्वतःच्या बळावर ध्येय गाठले असून त्याच्या या यशस्वी यश संपादन केल्याने राज्यभरात कौतुक होत असल्याचे प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.