प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने फिजिकल डिस्टन्सिंगसाठी जनजागृती मोहीम
औसा मुख्तार मणियार
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रीचा वापर केल्यास सुरेक्षित अंतर ठेवता येते.यासाठी प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने जुनी कापड गल्ली लातूर येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी छत्रीचा वापर करावा, जेणेकरून पावसापासून बचाव ह़ोऊ शकतो.तसेच सुरक्षित अंतर ठेवता येते.असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले होते.त्याची जनजागृती करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने २२ जुलै बुधवार रोजी जुनी कापड गल्ली लातूर बाजारपेठ परिसरात जनजागृती आली.घरी राहा-सुरक्षित राहा असा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड अजय कलशेट्टी, जितेंद्र ढगे, इंद्रजित वलाकाटे अनिल महिंद्रकर,अमोल भोकरे, आदित्य घोलप,अभय ढगे,प्रथमय मेंगशेट्टी,प्रणव महिंद्रकर,भागवत महिंद्रकर आदिसह प्रभुराज प्रतिष्ठानच्या सदस्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.