औसा शहरात पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय



औसा शहरात पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय
औसा मुख्तार मणियार
औसा शहरात ऐन पावसाळ्यात एक महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तावरजा धरणात पाणीसाठा जमलेला नाही, तसेच पावसाळा असतांना नागरिकांना पाणी मिळत नाही.श्रावण महिना झाला असून सणासुदीचे दिवस आल्यामुळे महिन्यांपासून शहरातील अनेक भागात नळाला पाणी नाही तसेच समता नगर येथे काही नळांना दोन ते तीन वर्षांपासून अजिबात पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची खंत तिथल्या नागरिकांनी केली आहे. व कालन गल्ली भागात तर दोन महिन्यांपासून नळाला पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची खंत भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे कार्यकर्ते पप्पु भाई शेख यांनी केले आहे.एकीकडे कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण असुन दुसरीकडे शहरात पाणीपुरवठा बंद असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.औसा शहराची विस्कळीत झालेले पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत होणे आवश्यक आहे.कारण भर पावसाळ्यात नळाला थेंबही पाणी येत नाही.शहरात घरोघरी शौचालय झाल्याने पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे सतत स्वच्छेतेसाठी पाण्याची अतिरिक्त गरज भासत असुन नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष सर्वच पक्षाचे नगरसेवक गप्प कसे काय? शहर वासियांना पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करुन नागरिकांच्या पाण्याचे तातडीने सोय करावी अशी मागणी होत असून नगराध्यक्ष डॉ अफसर शेख पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी या कामी लक्ष देणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या