औशात पथदिव्यांची लाईट तीन दिवसांपासून बंद



औशात पथदिव्यांची लाईट तीन दिवसांपासून बंद
औसा मुख्तार मणियार
औसा नगरपालिकेकडे तीन महिन्याचे विजबील थकल्यामुळे महावितरणने वीज खंडित केली आहे, त्यामुळे शहरात तीन दिवसांपासून अंधारात आहे. शहारातील महावितरणचे अभियंतास फोन केल्यास त्याचा मोबाईल नेहमी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचा आरोप ग्रांहकाच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच‌ शहरांतील महत्त्वाचे कार्यालय नेहमी बंदच दिसून येते.त्यामुळे मुख्यालयी न राहणाऱ्या या अभियंताचा बंदोबस्त करावा अशी मागणी औशाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी ऊर्जामंत्रीकडे केली आहे.कोरोना विषाणूचा जिवघेण्या संकटात किमान मुख्यालयी राहुन आणि वीजपुरवठा बाबत गैरसोय होणार नाही म्हणून काळजी घ्यावी याची कुठलीही तसदी महावितरणने शहर अभियंता घेताना दिसत नाहीत. नगरपालिकेकडुन केवळ तीन महिन्यांच्या थकित वीज बिलापोटी पांच दिवसा पासून शहरातील पथदिव्यांची लाईट बंद करण्यात आली आहे.कोरोनामुळे सर्वांची बिले थकीत आहेत.नागरिक आपला भरणा करुन महावितरणला सहकार्य करत आहे.पण पालिकेने विज भरणा केला नाही म्हणून शहर अंधारात ठेवले आहे.१३ लाख रुपये बाकी पोटी तीन दिवसांपूर्वी पालिकेचे पांच लाखाचे आर्टिजीएस महावितरणच्या खात्यात जमा केले.पण ही रक्कम आली नाही असे कारण दाखवून पथदिव्यांची लाईट बंदच ठेवली आहे.याबाबत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी महावितरणच्या अभियंता यांना सांगूनही पथदिवे सुरू होत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या