ग्राहक सेवा केंद्रावरुन पीक विमा भरण्याची शेतकऱ्यांना सोय
औसा मुख्तार मणियार
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून सोयाबीन, उडीद,तूर,मुग आणि बाजरी ह्या पिकाचे किडी- आळया, अतिवृष्टी, अवर्षण आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना विम्याचे संरक्षण कवच घेता येते. या योजनेत सहभागी होण्याकरीता शेतकऱ्यांना दि.31 जुलै 2020चीशैवटची तारीख देण्यात आली आहे.परंतू सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाउनच्या संकटामुळे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी बॅंकेत गर्दी होऊ शकते, पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी बॅंकेत गर्दी करु नये आणि गर्दी टाळता यावी म्हणून आपले सरकार या ग्राहक सेवा केंद्रावरुन शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची अॉनलाईन पध्दतीने सुविधा शहर व ग्रामीण भागात तरुणांनी सूरू केले आहे.ग्राहक सेवा केंद्रामुळे व जिल्हा मध्यवर्ती बँकेने सोसायटी मार्फत गावात पीक विमा प्रस्ताव आणि रक्कम स्वीकारण्याची सोय केली आहे.त्यामुळे बॅंकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राचा औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधार झाल्याने शेतकरी वेळेत पीक विमा भरू शकतील.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.