औसा कोवीड सेंटरला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली भेट
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यात कोवीड १९ च्या आजारांवर प्रतिबंधात्मक व नियंत्रण कशा पद्धतीने काम करत आहेत या बाबतीत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी कोवीड c c सेंटरला प्रत्येक्ष रूग्णाशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले हा आजार गंभीर नसुन काळजी घेण्याचा आहे असा आधार दिला.यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गंगाधर पोरगे सर,जिल्हा हिवताप तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख,SDO सोनकांबळे, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ,नायब तहसीलदार केसरकर आदि उपस्थित होते.हाच ताफा लामजना येथे गेला व नविनCCC सेंटरची पाहणी केली.व भविष्यात रूग्ण वाढ झाली तर पर्याय हे सेंटर राहील.याबाबत समाधान व्यक्त केले, तसेच कंटेन्टमेट झोनला भेट दिली असता ५० वयाच्या पुढील विविध आजाराची नोंद घेऊन आॅक्सिमीटर,spo टु थर्मामीटरद्वारे तपासण्या आरोग्य कर्मचारी,आशानी आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण चागल्या प्रकारे करत आहेत.याबाबत समाधान व्यक्त केले.प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन नॅशनल क्वालीटी इन्शुरन्स (NQS) कामाची वैद्यकीय अधिकारी डॉ पेंढारकर सर यांचेकडून माहिती घेतली.तसेच प्रयोगशाळा तपासणी विभागाची पाहणी केली.शेवटीऔसा ग्रामिण भागातील आरोग्य यंत्रणेचे काम पाहुन समाधान व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.