भाजपाची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
९१ जणांच्या कार्यकारिणीत ८ उपाध्यक्ष,३ सरचिटणीस व ८ चिटणिसांचा समावेश
लातूर/प्रतिनिधी ः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणीक, विभागीय संघटन मंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश सरचिटणीस आ. सुरजितसिंह ठाकूर यांच्या सुचनेनुसार आणि माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, खा. सुधाकर श्रृंगारे, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाने भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी 91 जणांच्या शहर जिल्हा कार्यकारिणीसह मंडलाध्यक्ष, विविध मोर्चा आघाडी अध्यक्ष तसेच सेल अध्यक्ष जाहीर केलेले आहेत. या 91 जणांच्या कार्यकारिणीत एक संघटन सरचिटणीस, दोन सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष तर आठ चिटणीस पदांचा समावेश आहे. नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी पदाधिकार्यांनी भाजपाचा प्रचार आणि प्रसार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.
भाजपाच्या लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी जाहीर केलेली असून यामध्ये उपाध्यक्षपदी सौ. सरिता राजगिरे, सौ. द्रोपदी कांबळे, श्रीराम कुलकर्णी, मनोज सूर्यवंशी, महेश कौळखैरे, योगेश उन्हाळे, सौ. दिपाताई गिते, तर संघटन सरचिटणीस म्हणून मनिष बंडेवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सरचिटणीस म्हणून शिरीष कुलकर्णी व प्रविण सावंत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून अॅड. दिग्वीजय काथवटे, व्यंकटेश कुलकर्णी, दशरथ सलगर, शिवराज टेकाळे, सौ. सुवर्णा येलाले, सौ. पार्वती सोमवंशी, सौ. मिना कुलकर्णी, सौ. अर्चना आल्टे यांना चिटणीस पदी नियुक्त करण्यात आले आहे. कोषाध्यक्ष म्हणून नरेश पंड्या तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून सुजीत नाईक व नागोराव बोरगावकर यांच्याकडे कार्यालयप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या सदस्यापदी गिरजाप्पा मुचाटे, हनुमंत जाकते, राजेश व्यास, शशिकांत हांडे, भानुदास डोके, जाफर पटेल, राजा माने, प्रविण अंबुलगेकर, सुनिल मलवाड, हनुमंत कुलकर्णी, व्यंकट वाघमारे, विक्रम शिंदे, दिलीप धोत्रे, आबा चौगुले, नागेश जाधव, शिवदयाल बायस, अजय दुडिले, राजकुमार परदेशी, गुरुनाथ झुंजारे, गोवर्धन भंडारी, आशिष पत्की, सौ. कल्पना बावगे, सौ. राघिनी यादव, सौ. शशिकला गोमचाळे, सौ. स्वाती घोरपडे, सौ. कोमल वायचाळकर, सौ. श्वेता लोंढे, सौ. शितल मालू, सौ. शकुंतला गाडेकर, सौ. अश्विनी बिराजदार, सौ. जान्हवी सूर्यवंशी, सौ. शेख समिना, सौ. विमल कसबे, सौ. पुष्पा बडीकर, सौ. लता बडगिरे, सौ. पुजा चौगुले, सौ. वैशाली सगर, सौ. अर्चना मद्रेवार, सौ. शामा गोखले, सौ. जयश्री बारकुते, सौ. मानसी वैद्य, रेणुका बोरा, सुभाष सुलगुडले, दिनकर पाटील, विद्यासागर शेरखाने, अजय जाधव, प्रल्हाद नागिमे, प्रविण येळे, रामेश्वर भराडिया, प्रमोद गुडे, देवा साळुंके, नितीन वाघमारे, अनिल शिंदे, राजू सोनवणे, प्रविण कस्तुरे, भिमाशंकर बेंबळकर, गोपाळ वांगे, हेमंत जाधव, अंकित बाहेती, अनंत गायकवाड, राजू आवस्कर यांची वर्णी लागलेली आहे.
निमंत्रित सदस्य म्हणून माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, सौ. स्मिता परचुरे, माजी महापौर सुरेश पवार, माजी उपमहापौर देविदास काळे व स्थायी समिती सदस्य अॅड. दिपक मठपती यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले आहे.
शहर जिल्हांतर्गत सात मंडल असून या मंडलांच्या अध्यक्षांचीही नावे जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये सिध्देश्वर मंडलाच्या अध्यक्षपदी अॅड. ललित तोष्णीवाल, डॉ. बाबासाहेब मंडल अध्यक्षपदी रवि सुडे, महात्मा बसवेश्वर मंडल अध्यक्षपदी संजय गिर, छत्रपती शिवाजी मंडल अध्यक्षपदी सौ. शोभा पाटील, स्वामी दयानंद मंडलाध्यक्षपदी प्रविण घोरपडे, अहिल्यादेवी मंडलाध्यक्षपदी सतिष ठाकूर तर ज्योतीराम चिवडे यांची संभाजीराजे मंडलाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीसोबतच भाजपाच्या विविध मोर्चांच्या अध्यक्षांचीही नावे जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये युवा मोर्चा अध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. मिनाताई भोसले, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी सौदागर पवार, अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी विजय आवचरे, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी देवा गडदे, आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी परमेश्वर महांडुळे तर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी मुन्तेजबोद्दीन हाश्मी यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी अंतर्गत विविध आघाड्या असून यामध्ये कामगार आघाडीचे अध्यक्ष म्हणून कमलाकर डोके, उद्योग आघाडी अध्यक्ष म्हणून विकास देशपांडे, व्यापार आघाडी अध्यक्षपदी मधुसुदन पारीख, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्षपदी मंगीलाल सुतार, दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्षपदी गणेश अय्यंगार, भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्षपदी पप्पु धोत्रे, वैद्यकीय सेल अध्यक्षपदी सचिन डॉ. सचिन राऊत, कायदा सेल अध्यक्षपदी अॅड. श्रीराम कुलकर्णी, सहकार सेल अध्यक्षपदी गणेश कवठे, मच्छिमार सेल अध्यक्षपदी गोरख सारगे, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्षपदी आनंद कोरे, सोशल मीडिया अध्यक्षपदी विपुल गोजमगुंडे, माजी सैनिक सेल अध्यक्षपदी मंजर रघुनाथ बोरुळे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या अध्यक्षपदी शिवराज फफ्फागिरे, दिव्यांग सेल अध्यक्षपदी ज्योतिताई मारकडे, प्रज्ञा सेल अध्यक्षपदी अॅड. कैलास अनसरवाडेकर, शिक्षक सेल अध्यक्षपदी वैजनाथ होळे, सांस्कृतिक सेल अध्यक्षपदी डॉ. सौ. जयंती आंबेगावकर तर अध्यात्मिक समन्वयक म्हणून बालाजी गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष आंमत्रित सदस्य म्हणून माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्यू पवार, माजी खा. सुनिल गायकवाड, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, निलेश ठक्कर, जितेश चापसी, सुरेश जैन, सुनिल होनराव व दिलीप पांढे आहेत.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, खा. सुधाकर श्रृंगारे यांच्यासह भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी नुतन कार्यकारिणीत निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले असून या कार्यकारिणीने भाजपाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाचे संघटन वाढविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.