कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढल्याने वृध्दाची चिंता वाढली
औसा मुख्तार मणियार
औसा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा रुग्ण संख्येत वाढ होत असून ही वाढती संख्या वृध्दाची चिंता वाढविणारी आहे.औसा,एल्लोरी,आंदोरा,भेटा,आणि सारोळा येथील प्रत्येकी एक अशा पांच रुग्णास आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे.शहरासह एरंडी, हिप्परगा आलमला,बुधोडा आदि गावातील कोरोना विषाणूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने अशा रूग्णाच्या संपर्कामुळे इतर विविध गावात कोरोनाचे नव्याने रुग्ण वाढत आहेत.दि. १ जुलै रोजी एकाच दिवशी औसा तालुक्यात नव्याने १७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून लॉकडाऊनचे नियम आणि संचारबंदी कलम १४४ चे पालन कोणीही करीत नसल्याचे दिसत आहे अनलॉक काळात सर्व व्यवसाय सुरू झाल्याने औसा शहरात गर्दी वाढली आहे.आरोग्य सेतू प नियमाचे कोणीही पालन करीत नसल्याने सामाजिक अंतरचे नियम ध्याब्यावर बसविले आहे कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूकडे कोणीही गांभीर्याने घेत नाही.विविध व्यवसायाची दुकाने खाजगी व शासकीय कार्यालये, बॅंका अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिग पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.शहरातील वाढती गर्दी आणि रहदारी काही केल्या कमी होत नसल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.नगरपरिषदेने विना मास्क फिरणारे नागरिक, ग्राहक,व विक्रेत्यांवर वचक बसविण्यासाठी दंडात्मक कार्यवाही सूरु केली आहे.सांयकांळी पांच वाजल्या नंतर सर्व व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करावे यासाठी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रयत्न करीत आहेत.औसा शहरातील गर्दी कमी करण्यासाठी शहरात १५ दिवसाचे कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस नगरपालिकेने वरीष्ठाकडे करावी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जनतेतून येतआहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.