खाजगी दवाखान्यांची फीस निश्चित करुन ,
कोरोना उपचाराची सक्ती डाँक्टरांना करावी !
-------- --------- ------ ----- --------- -------------
कोविड 19 आटोक्यात येत नाही. लाँकडाऊन हे साखळी तोडण्याचे माध्यम असले तरी तो अंतिम पर्याय नाही.सरकारी यंञणा आणि लोकसंख्या , याचा विचार केला तर सरकार पुरे पडणार नाही.शिवाय कोरोना भलताच जिवघेणा आजारही नाही.सरकारी दवाखान्यात केले जाणारे उपाय , प्रतिकार शक्ती वाढवणारेच आहेत , असे अनेक तज्ञ सांगतात.शिवाय यावर सरकारी दवाखान्यात खास औषध आहे , असेही नाही.कोरोना पाँजिटिव्ह रुग्ण हात हालवीत कोरोना सेंन्टर मध्ये जात आहेत आणि योद्धा म्हणून बाहेरही येत आहेत.कोरोना लागण दर कितीही असला तर बरे होणाऱ्यांची टक्केवारी आणि प्रत्यक्ष मृत्यू दर पाहाता , फार कांही गंभीर आहे असे नाही.सर्दी खोकला ताप ,श्वासांचा कमजोरपणा , आँक्सिजन लेवल खालावणे आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा , यालाच कोरोना म्हटले चालले आहे, आणि त्यामुळे जनमाणसांत प्रचंड भीती पसरली आहे.जनजिवन उद्धवस्त झाले आहे.व्यवसाय , रोजगार , उद्योग सर्व पाण्यात गेले आहे.
आजही देशात 40 टक्के नागरिक रोजनदारीवर जिवन जगत आहेत.एक दोन महिने ठीक आहे , पण चार चार पाच पाच महिने ' घरी राहा सुरक्षित राहा ' असे आवाहन करुन चालणार आहे का ? शेवटी खायचे काय आणि बालबच्चे घरग्रहस्थी चालवायची कशी ? घर भाडे , दुकान भाडे कुठून द्यायचे ? हे सर्व सरकारने चालवावे , असे राजकीय विधान आम्ही करणार नाही.राज्य सरकार , केंद्र सरकार आपल्या क्षमते नुसार प्रयत्न करीतच आहे.पण हे प्रयत्न प्रतिबंधात्मक आहे.लस येतेय पण त्याला अजून तीन महिने लागतील.बहुधा डिसेंबर मध्ये संपूर्ण देशात अशी लस उपलब्ध होईलही.आपले सर्वाचे जिवन चक्र थांबले आहे.हात थांबले चाक थांबतात आणि चाक थांबले की संपूर्ण व्यवस्थाच कोलमडते.सध्या आपली वाटचाल अशीच आहे.
माझी सरकारला विनंती आहे.राज्यात देशात करोडो खाजगी दवाखाने आणि चांगले डाँक्टरआहेत.या सर्व दवाखान्यांना आणि डाँक्टरांना कोविड 19 वर उपचार करण्याची परवानगी द्यावी किंवा तशी सक्ती करावी.उपचाराचा खर्च सरकारने निश्चित करुन द्यावा , हवे तर कांही सरकारी मदत सर्व दवाखान्यांना पुरवावी.जसे की मोफत औषध पुरवठा वगैरे किंवा तज्ञांच्या सल्ल्या नुसार.ताप सर्दी खोकला असणाऱ्या पेशेंटला आपल्या पसंतीच्या खाजगी दवाखान्यात सहज जाता यावे आणि उपचार घेता यावेत , इतकी ही यंञणा सहज करावी.कोविड चाचणीचे उपकरणे अत्यंत स्वतात दवाखान्यांना उपलब्ध करुन द्यावेत.कोरोनाला सामान्य आजार घोषित करुन सामान्य उपचारात रुग्ण बरे करावेत.बाजार व्यवहार व्यापार उद्योग मोकळे करावेत.थांबलेले हात आणि क्रय शक्तिला पुन्हा गती द्यावी.कोविडची जनमानसात पसरलेली भीती कमी करावी.सरकारी यंञणा सरकारी कामात आणि खाजगी दवाखान्यावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत ठेवावी.जनतेला मास्क आणि सुरक्षित अंतराचे बंधन करावे. एका चाकोरीत जगणे जनतेला शिकवावे व आणि मलई लाटणे बंद करुन जनतेची सेवा करण्याचे आदेश खाजगी डाँक्टरांना द्यावेत.आता हाच पर्याय ठरु शकतो.आणि आपण कोरोनावर मातही करु शकतो.आम्ही व्यक्त केलेले विचार सदोष असू शकतात पण निदान त्या दिशेनं एक पाऊल म्हणून विचार करावा.एकट्या सरकारने या महामारीच्या विरोधात लढू नये.सर्व खाजगी दवाखाने व डाँक्टरांना सोबत घ्यावे.मला विश्वास वाटतो , असे कांही निर्णय आपण घेतले तर आपला देश आणि आपली व्यवस्था वाचेल.
अधिक काळ लाकडाँऊन किंवा संचार बंदी घातक ठरु शकते .देश मोठा आहे आणि साठा मर्यादित आहे.त्यासाठी हात मोकळे करा चाक फिरवा , चक्र फिरु लागेल आणि एका संकटातून आपण सर्वजन बाहेर पडू .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.