सोलापुर बातमी
सोलापूर शहर आणि जिल्ह्याची कोरोना स्थिती आज दिनांक 26 जुलै रात्री नऊ वाजता...
शहर आणि जिल्ह्यात मिळून आज कोरोनाच्या 3955 चाचण्या झाल्यात . यात 316 रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत, तर मृतांची संख्या 9 आहे. तर आज जिल्ह्यात 391 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सोलापूर शहरात आज 2700 शे अहवाल प्राप्त झाले. यात 2538 निगेटिव्ह ,
*162 पॉझिटिव्ह* रुग्ण आहेत. आज शहरात 43 जण कोरोना मुक्त झाले तर 3 मृतांची नोंद आहे.
सोलापूर ग्रामीण मध्ये आज 1255 अहवाल प्राप्त झाले 1101 निगेटिव्ह तर *154 पॉझिटिव्ह* अहवाल आहेत. आज ग्रामीण मध्ये 348 जण कोरोना मुक्त झाले तर सहा मृतांची नोंद आहे
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7383 झाली आहे; तर यातील
4118 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सध्या 2845 जणांवर उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत कोरोना ने 420 जणांचे बळी गेले आहेत.
@ सोलापुरात गेले दहा दिवस सुरू असलेला लॉकडाऊन आज मध्यरात्री बारानंतर संपत आहे. सोमवारी अत्यावश्यक सेवा सुरू होतील तर मंगळवारपासून बहुतेक सर्व व्यवहार पूर्वीच्या नियमांप्रमाणे सुरू होतील.
@ पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापूर शहरात यापुढे संचारबंदी लागू केली जाणार नाही मात्र बार्शी शहर व तालुक्यातील स्थिती पाहता तिथे 31 जुलैपर्यंत संचारबंदी लागू असेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील बार्शी, अक्कलकोट ,मोहोळ सह काही गावात लागू केलेली संचारबंदी 31 जुलै पर्यंत लागू राहील. मात्र यातील काही गावांमध्ये खरेदीसाठी 27/28 तारखेला काही सवलत देण्यात येणार आहे.
*सोलापूरचे आजचे तापमान*
26-07-2020
कमाल तापमान
31.6 88.9
किमान तपमान
22.6 72.7
आर्द्र्ता 61%
पाऊस 0
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.