कोरोनाची साखळी तोडण्यासाठी औशात कडक लॉकडाऊन
औसा मुख्तार मणियार
कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने लातूर चे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी 15 जुलै ते 31 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन ची घोषणा केली होती परंतु 25जुलै पर्यंत काही प्रमाणात या ठिकाणी थोडी शिथिलता दिली होती.परंतूआज दि.26 जुलै रविवार पासुन लॉकडाऊन अंत्यंत कडकपणे अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.सध्या औसा शहरात पोलीस प्रशासनांनी लॉकडाऊन मध्ये अत्यंत कडक अंमलबजावणी करत आहेत.सध्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणा-या लोकांना कार्यवाही करत आहेत .कश्या पध्दतीने काय कारणानुसार बाहेर पडत आहे याची चौकशी करत आहेत.या लॉकडाऊन मध्ये केवळ दवाखाने याच बरोबर वैद्यकीय दुकाने आणि कृषी सी संबंधित दुकाने अति आवश्यक सेवा यांना मुभा देण्यात आलेली आहे.आणि संपूर्ण औसा बाजारपेठ बंद केलेला आहे.शासनाच्या आदेशानुसार व्यापा-यानीही देखील हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले आहे.जेणेकरुन कोरोनाची भीती आहे. दिवसेंदिवस कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन हि संख्या आपण या ठिकाणी त्याची जी साखळी तोडण्यासाठी नक्कीच प्रशासनाला आणि पोलिस दलांना यश मिळेल यामध्ये काही शंका नाही..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.