मुरूडमध्ये लातूर ग्रामीण वृक्ष चळवळी अंतर्गत वृक्षारोपण
आ. धीरज देशमुख यांचे संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरुड प्रतिनिधी:-
भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेवून लातूर ग्रामीणचे आ. धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर ग्रामीण वृक्ष चळवळ सुरू केली या अंतर्गत आज मुरुड येथील बस स्थनाका समोर नव्याने होत असलेल्या चौपदरी रस्त्यालगत दोन्ही बाजूने 45 झाडे लावून वृक्षलागवड कार्यक्रमाचं ऑनलाइन पद्धतीने उदघाटन केलं.
मुरुड मधील पंचवीस डॉक्टरांनी एकत्र येऊन रस्त्यालगत "एक डॉक्टर... एक झाड" या नुसार झाडे लावली तसेच आ.धीरज देशमुख यांच्या चळवळीला प्रतिसाद देत मुरुड ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच यांनी ग्रामस्थ व व्यापारी यांच्या सहभागातून आज 45 झाडे लावून या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदविला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वृक्षलागवडीला मिळणारा प्रतिसाद खूप कौतुकास्पद असून विशेषतः युवा वर्गाची असलेली सकारात्मक भूमिका बघून त्यांचं कौतुक आ. धीरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख ,ग्रामीणचे आ. धीरज देशमुख व जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे यांच्या प्रयत्नामुळे मुरुड बसस्थानका समोरील रस्त्याचे चौपदरीकरण व महामार्गाला अप्रोच रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे. या रस्त्यालगत तीन वर्ष वयाची मोठी झाडे व व त्यांना संरक्षण करणारी सिमेंटचे रिंग अशा पद्धतीने नियोजन बद्ध वृक्षारोपण व संगोपनाचा उपक्रम गावातील युवा पिढीने हाती घेतला असून आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली किमान २०० झाडे रस्त्यालगत लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या रस्त्यालगत नियोजनबद्धरीत्या झाडे लावल्या मुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यावरणाच्या दृष्टीनेही खूप मोठा फायदा होणार आहे.
यावेळी मुरुड चे सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नवगिरे, चंद्रकांत मोरे, रवी अंधारे, नवनाथ कोपरकर, राजेंद्र मस्के,शहर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तम जाधव, भारत लाड, जगन चव्हाण, अजिज शेख, समाधान गायकवाड, गुलाब शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.