जमदाडे प्रबोधन मंचच्या वतिने घेण्यात आलेल्या ’कोरोना काळातील समाजजीवन ’राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत माधव जाधव प्रथम




जमदाडे प्रबोधन मंचच्या वतिने घेण्यात आलेल्या ’कोरोना काळातील 
समाजजीवन ’राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत माधव जाधव प्रथम 
............................................
लातूर/प्रतिनिधी ः  कै.अ‍ॅड. देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचार मंच, लातूर द्वारा ’कोरोना काळातील जनजीवन’ या विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्व दूर जिल्ह्यातून कवींचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी, व्यापारी, नोकरदार, मजूर, आपापसातील दुरावा, समज-गैरसमज, देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, त्या सोबतच कोरोना योद्धांच्या बाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, कोरोना महामारी मुळे संपूर्ण समाजजीवन कसे ढवळून निघाले याचेही वास्तव दर्शन या कवितेतून कवींनी घडविले.
या काव्यलेखन स्पर्धेत माधव जाधव (नांदेड) प्रथम, नरसिंह जगदाळे (बार्शी) द्वितीय, नामदेव कोदरे (लातूर) द्वितीय, ज्ञानोबा पावडे (परभणी) ततीय, मीना महिंद्रकर (देवगाव)रंगारी तृतीय,तर प्रा. अरविंद पाटील (वर्धा) उत्तेजनार्थ, कविता नेहेरे-धुमाळ (पुणे)उत्तेजनार्थ,सुवर्णा पवार -अंबाड (लातूर) उत्तेजनार्थ, क्रमांक मिळवला. या काव्यलेखन स्पर्धेत यशस्वी होणान्या कवींना प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ दोन असे सन्मानपत्र देण्यात येणार होते, परंतु या स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद पाहून यात दोन द्वितीय, दोन तृतीय, व उत्तेजनार्थ तीन असे सन्मानपत्राची संख्या संयोजकांनी वाढवली.
सर्व यशस्वी कवींचे मंचचे अध्यक्ष डॉ.संतोष जमदाडे, मुख्य संयोजक डॉ. संजय जमदाडे व संयोजक प्रा.डॉ.कमलाकर चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. या काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. संजय जमदाडे व अभय करंदीकर यांनी काम पाहिले. सर्व यशस्वी व सहभागी कवींना व्हाट्स अ‍ॅप वर सन्मानपत्र देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या