वृत्तपत्र वितरक नईमोद्दीन शेख यांचे निधन...
औसा प्रतिनिधी/- औसा येथील वृत्तपत्र वितरक नईमोद्दीन रहीमोद्दीन शेख वय 65 यांचे रविवारी दि. 19 जुलै रोजी सायंकाळी 4 : 30 सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. नईमोद्दीन शेख हे उत्कृष्ट बाईंडर, कंपोझिटर, म्हणून अनेक वृत्तपत्रात काम करीत होते. आपल्या प्रेमळ आणि प्रामाणिक स्वभावामुळे औसा शहरात वृत्तपत्र वितरक म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री 8 : 00 च्या सुमारास लंगर पट्टी कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात आला. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सोशल डिस्टन्स ठेवून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.
शोक सन्देश
अतिशय दुखद घटना......नय्युम चे हे असे जाणे मनाला चटका लावुन जाणारे आहे ईश्वर त्यांच्या अत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या परिवाराला या दुखातुन बाहेर पडण्याची शक्ती देवो.
समीर डेंग, नगरसेवक न प औसा
अत्यंत वाईट दुःखद माहिती आपल्या सर्वांचा लाडका प्रिय मनमिळाऊ प्रामाणिक हवा हवासा वाटणारा. घरचा , जिवाळ्यचा नयूम अकस्मात गेला यावर विश्वासच बसत नाही... आमच्या सर्वांचा जवळचा मित्र हरवला. शेवटी आपण पराधीन आहोंत सारे. नयूम भाई.... Accha इन्सान दोस्त था, अल्ला माऊली सारे घर वालो को ये सदमा बरदाश करनेकी ताकद और दुवा दे दे. भावपूर्ण श्रद्धांजली
एडवोकेट शाम कुलकर्णी वरिष्ठ पत्रकार
भावपूर्ण श्रद्धांजली
अत्यंत दुर्दैवी घटना ...नय्युम भाई अत्यंत मेहनती व्यक्ती होता...ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या परिवारास दुःख झेलण्याची शक्ती देवो... मिटकरी परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे
सचिन मिटकरी सचिव लातूर जिला मराठी पत्रकार संघ लातूर
मनोगतचे आँफसेट मशीन आँपरेटर ,
माझे गेल्या पंचवीस वर्षापासूनचे सहकारी ,
आमच्या परिवारातील सर्वांचे लाडके चाचा ,
नयुमोद्दीन शेख यांचे दुःखद निधन !
अश्रू चिंब श्रद्धांजली !!
राजू पाटील संपादक मनोगत व मनोगत परिवार औसा
नयुम ची अचानक Exit ....चटका लावून जाणारी आहे .......एक निर्मळ मनाचा सच्चा मित्र नव्हे तर औशाच्या वृत्तपत्र क्षेत्रातील आपल्या सर्वाचा सखा , सोबती आज निघून गेला ...गेल्या अनेक वर्षापासून रमजान ईदला नयुमचा घरी जायचे ....अत्यंत आपुलकीने तो जेवायला वाढायचा .माझे मामा.कै विजूप्पा वळसंगे यांच्याकडे नयुम यायचा .कै चंदू भाऊ राचट्टे , कै .चंदूभाऊ हंचाटे यांच्या सोबत नयुम असायचा .. धर्म , .जातिपातीच्या पलिकडचा हा माणूस गेल्याच आज खुप मोठ दुःख आहे ...औशातील एक चांगला सोबती आम्हाला सोडून गेला .........ईश्वर नयुमच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ....हीच प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली .....
संजय सगरे वरिष्ट पत्रकार
शेख नईम रहीम साब जीस ने अपनी जिंदगी के 45 साल प्रेस लाईन मे गुज़ारे उन का 60 साल की उम्र मे कल इंतेकाल की खबर से औसा के प्रेसलाईन मे ग़म की घटा छायी, बडी मिलनसारी , इमानदारी थी.सब पत्रकारों के चहीते थे.दै.मनोगत परिवार से आखीर दम तक संबंध रहा.अखबार की कंपोजिंग से लेकर प्रिंट और हाॅकर तक की खुबीयाँ थीं.नईम भाई हरफन मौला थे. मेरा उन से बचपन से ताल्लुक रहा है.और आखीर तक कायम रहा. हमेशा दो चार अखबार घर तक पहुंचाते रहेते,कोई खास बात होती या रिपोर्ट होती तो बताते.
कम का ग़म और ज्यादा की लालच नही थी.
अल्लाह मरहुम नईम को जन्नतुल फिरदोस मे जगह अता फरमाये और पसमांदगान को सबर दे.. आमीन
मु मुस्लिम कबीर लातूर जिला उर्दू मीडिया
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.