औशात कोरोना विषाणूंने सात जणांचा बळी : शहरात रस्ते पडले ओस
औसा मुख्तार मणियार
औसा शहर आणि तालुक्यात कोरोना बाधितांनी अवघ्या दिड महिन्यात कोरोना विषाणूंने सात जणांचा बळी घेतला आहे.शनीवारी दि.१८ जुलै रोजी शतक ओलांडले असून दि.४ जुलै ते १८ जुलै २०२० या कालावधीत कोरोना बाधितांची संख्या १०३ झाली आहे.शहराच्या विविध भागासह ग्रामिण भागात नवनवीन गावात कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनासह जनतेची चिंता वाढली आहे.औसा तालुक्यात रुग्ण संख्येने झपाट्याने वाढ होत आहे. अनलाॅक काळात जनतेच्या मोठ्या प्रमाणात झालेला वावर खाजगी व शासकीय कार्यालयासह व्यापारी अस्थापनांच्या ठिकाणी होणारी गर्दी आणि सोशल डिस्टंसिग नियमांचे होत असलेले उल्लंघन यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने दि.१५ जुलै ते ३० जुलै दरम्यान नाविलाजाने पुन्हा प्रशासनाला लॉकडाऊन व संचारबंदी लागू करावी लागली. लॉकडाऊन ५ चा दि.१८ जुलै रोजी औशात चौथा दिवस असून औसा शहरातील रस्ते ओस पडले आहेत. सर्वच औसा शहरातील व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवली असून सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत केवळ कृषी सेवा केंद्र,आणि दवाखाने शेजारील मेडिकल दुकाने सुरू होती.लॉकडाऊन ५ मध्ये जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असून पेट्रोल पंपावर पेट्रोल,डिझेल देण्यासाठी बंदी घातली असल्यामुळे औसा शहरातील रस्ते ओस पडलेली दिसत आहेत.गावातील सर्व व्यापार बंद असल्याने कोणीही घराबाहेर पडत नाही. अनेकांनी थेट शेत शिवार गाठुन शेतातील कामे उरकण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा उपयोग केला असल्याचे दिसते.शहर आणि तालुक्यातील कोरोना विषाणूं प्रसाराची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची सर्व स्तराकडून चिंता पसरली असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असुन विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.