ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ-एक साहित्यिक प्रवाह.
मराठी साहित्य विश्वात अनेक साहित्य प्रवाह रूढ झाले आहेत . आणि हे सर्व एकाएकी घडले नाही. या प्रवाहांच्या पाठीमागे वैचारिक बैठक आहे. ह्या आधुनिक मराठी साहित्य प्रवाहांनी मराठी साहित्य समृध्द केले आहे. तत्वतः काही परिवर्तनेही घडविली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार व प्रचार वाढत होता. निरनिराळे समाजस्तर शिक्षणाच्या कक्षेत येत होते. अभ्यासक्रमाच्या निमित्ताने किंवा आवड म्हणून साहित्य वाचले जायचे त्यावेळी आपला गांव, आपली माणसे, आपला समाज, आपला शिवार, आपली माती ,आपली सुखदुःखे , आनंद, यशापयश, विचार, आंदोलने, आणि भावना यांचे दर्शन त्या साहित्यातून होत नव्हते. म्हणून १९५० नंतरच्या काळात साहित्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत गेला व नवीन प्रवाह निर्माण झालेत , त्यामुळे एकूणच मराठी साहित्य विकसित होण्यास मदत झाली आहे. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह हा तसा प्रमुख साहित्य प्रवाह आहे. ज्या ग्रामव्यवस्थेमध्ये कवी, लेखक राहतो, ती ग्रामव्यवस्था त्यांच्या साहित्यातून अजाणता का होईना, प्रकट होत राहते. या अर्थाने ग्रामीणत्वाच्या स्पष्ट खुणा त्यांच्या वाड्ःमयात सापडतात.
भारत हा मुळात शेतीप्रधान आणि खेड्यापाड्यांचा देश आहे. बहुजनांची साहित्यपरंपरा येथल्या ग्रामजीवनाभोवती गुंफलेली आहे. त्यामुळे अनेक समुहाच्या अनेक भाषा आहेत. त्यात बोली भाषा व व्यवहारी भाषा अशा भिन्न भाषा अनेक समुहात बोलल्या जातात. ग्रामीण मुस्लिम समाजात बोलीभाषा व व्यवहारी भाषा अशा भिन्न भाषा आहेत. हा समाज घरी दखनी-उर्दू तर दारी मराठी भाषेत व्यवहार करताना दिसतो .शहरी भागात क्वचितच घरी मराठी भाषेत बोलतो . तसे पाहता ग्रामीण मुसलमान घरी-दारी मराठीतून व्यवहार करताना दिसतो . नव्वदच्या दशकानंतर मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात परिवर्तने घडली. हा समाज मराठीतून मोठ्या प्रमाणात शिक्षण घेताना दिसतो आहे. त्याचाच परिणाम म्हणून तो मराठी भाषा उत्तम बोलतो, वाचतो आणि लिहितोही आहे. साहित्य ही एक सामाजिक घटना आहे . हे आता कळायला लागले.
ग्रामीण भागामध्ये खेड्यात मुस्लिमांची मोजकीचं घरे असली तरी खेड्यातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो. त्यांच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर मराठीमय असतो यात शंका नाही. त्यामुळे तो शहरी भागातील मुस्लिमांपेक्षा मराठी उत्तम बोलतो उत्तम लिहितो. ग्रामीण भागामध्ये साजरे होणारे सण- उत्सव, पिराचा- वलींचा उरूस , ग्रामदैवतांची जत्रा यांच्याशिवाय ग्रामसंस्कृती पूर्ण होत नाही. हे ग्रामसंस्कृतीचे घटक त्या त्या गावचे एक मानसविश्व निर्माण करतात. सर्व धर्माच्या सर्व मराठी संताच्या अभंगाची भाषा ग्रामीण भागात बोलली जाणारी आहे. अभंगसृष्टीमधून बोलीचा सहज वापर होताना दिसतो.
ग्रामीण परिसरातून झपाट्याने पुढे येणारा नवा उत्साही लेखकवर्ग आपल्या जीवनसमुहातील सुख-दुःख, सामाजिक समस्या यांचे चित्रण आपल्या बोलीभाषेतून अभिव्यक्त करु लागला. अशा साहित्याच्या दरबारात जे मागे मागे उभे आहेत , त्यांच्याकडे आता लक्ष दिले पाहिजे. त्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे. मराठी साहित्याचा दुर्लक्षित मध्यवर्ती ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह प्रवाही व्हावा ', त्यात नवे नवे अनुभव व्यक्त व्हावेत, त्याचे सामर्थ्य वाढावे, भाषाविषयक सामर्थ्य अधिक गतिमान व्हावे, आणि इथल्या संस्कृतीशी असलेले नाते दृढ व्हावे आणि एकूणतः मराठी साहित्य सर्व बाजूंनी समृध्द व श्रीमंत व्हावे ! ग्रामीण साहित्याची चळवळ सांस्कृतिक चळवळ आहे , ग्रामीण साहित्य हे परिवर्तनवादी साहित्य आहे. त्याची स्वतःची एक जीवनदृष्टी आहे. अशी भूमिका घेऊन ग्रामीण भागातून लिहीणा-या मुस्लिम मराठी साहित्यीकांची ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ प्रवर्तक / संस्थापक शेख शफी बोल्डेकरांनी निर्माण केली.
ज्यांच्या घरात शेकडो वर्षांपासून अज्ञान व दारिद्र्य नांदत असेल अशा प्रतिभावंताना या चळवळीची आवश्यकता निश्चितच अधिक असणार आहे यात शंका नाही. ही चळवळ हक्काने बोलतो ही मराठी आणि लिहितोही मराठी अशी मराठीची सर्वांगाने साक्ष देणारी आहे. या ऐतिहासिक ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या क्षेत्रात अधिक गतिमान करण्यासाठी अनेक मान्यवर साहित्यीकांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. ही चळवळ 1 मे 2001 ला स्थापन झाली आहे. वाढलेले धार्मिक कर्मकांड , हिंदूमुस्लिम तणाव अशा परिस्थितीत अज्ञानी आणि मूढ लोकांचे उद्दबोधन करणे , मुस्लिम साहित्यीकांना मोठे विचारपीठ मिळवून देणे. साहित्याद्वारे समाजाचे प्रश्न मांडणे व सोडवणे. भाषिक ऐक्य निर्माण करणे. समतावादी संविधानीक समाजाच्या निर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. ग्रामीण मुस्लिम समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व मराठी राजभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या चळवळीचे प्रमुख उद्देश आहेत. वाड्ःमयीन चळवळ ही वाड्ःमयापुरती असत नाही तर ती जीवनसंघर्षाचा एक अपरिहार्य भाग बनते. ग्रामीण जीवनातील आज निर्माण झालेले बहुसंख्य प्रश्न जातीव्यवस्थेने निर्माण केले आहेत. तसेच अर्थव्यवस्थेने ही निर्माण केले आहेत. ह्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ह्या चळवळीची संरचना गावप्रमुख ,तालुकाप्रमुख , जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख अशा पध्दतीची असून महाराष्ट्रात ही चळवळ अधिक गतिमान होताना दिसते आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चळवळीसाठी पदाधिकारी निवडल्या जात आहेत. मराठवाडाप्रमुख अॅड. हाशमपटेल, मार्गदर्शक प्रा. मैनोद्दीन मुल्ला साहेब,डाॅ . सय्यद जब्बार पटेल ,विदर्भ विभाग प्रमुख शेख बिस्मिल्ला सोनोशी, खानदेश विभागप्रमुख अॅड. जमील देशपांडे, ,पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख खाजाभाई बागवान, पुणे जिल्हाप्रमुख बा. ह. मगदूम, नांदेड जिल्हाप्रमुख शेख निजाम गवंडगांवकर, लातुर जिल्हाप्रमुख अॅड. शेख इक्बाल रसूलसाब, परभणी जिल्हाप्रमुख सय्यद चाँद तरोडकर , औरंगाबाद जिल्हाप्रमुख हबीब भंडारे, अहमदनगर जिल्हाप्रमुख सौ. दिलशाद यासीन सय्यद, हिंगोली जिल्हाप्रमुख अहमद पिरानसाहेब, उस्मानाबाद जिल्हाप्रमुख शेख शाहीद ,सोलापूर जिल्हाप्रमुख जाकीर मोहम्मद तांबोळी, औसा तालुकाप्रमुखपदी के. टी.काझीसर, पंढरपूर तालुकाप्रमुख फिरोजखान बन्सीलाल बागवान, दौंड तालुकाप्रमुख अनिसा सिकंदर शेख, मोहोळ तालुकाप्रमुख मोहम्मद अली पठाण, नांदेड तालुकाप्रमुख शेख जाफर राजेसाहाब, कंधार तालुकाप्रमुख शेख युसूफसाहाब , बिलोली तालुकाप्रमुख जाफर आदमपूरकर, देगलूर तालुकाप्रमुख फजल मुल्ला, नायगाव तालुकाप्रमुख पिंजारी गौस साहाब ,उत्तर नांदेड प्रमुख शेख महंमद नूर, लातुर तालुकाप्रमुख अॅड. इरफान आर.शेख ,औसा शहरप्रमुख अॅड. फेरोजखान यू. पठाण, शेख पत्रकार सलिमशाह , कळमनुरी तालुकाप्रमुख फ्याज शेख यांचे योगदान चळवळीसाठी मोलाचे आहे. प्रख्यात साहित्यिक प्रा. जावेद पाशा कुरेशी , ख्यातनाम कवी खलील मोमीन , ख्यातनाम समिक्षक डॉ. अक्रम हबीबखान पठाण ,चळवळीचे जाणकार मराठा खान , मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने आदि मान्यवर चळवळीची ढाल बनून आमच्या सोबत आहेत . ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीसाठी अन्य भारतीय बंधू
आगे बढोचा सल्ला देत आहेत.
-शेख शफी बोल्डेकर,संस्थापक, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ, महाराष्ट्र।
मोबाईल : 7798967793
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.