जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 25 रुग्ण तर 16 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 209 रुग्णांवर उपचार सुरु
·
हिंगोली, दि.9: जिल्ह्यात 25 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
विद्यानगर कळमनुरी 1 व्यक्ती, इंदिरा नगर कळमनुरी 1 व्यक्ती, औंढा नागनाथ 1 व्यक्ती असे 3 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे तर जि.रु. हिंगोली 2 व्यक्ती, पोस्ट ऑफीस रोड 1 व्यक्ती, सरस्वती नगर 1 व्यक्ती, फलटन 1 व्यक्ती, गंगानगर 1 व्यक्ती, पेन्शनपुरा 1 व्यक्ती, तालबाकट्टा 1 व्यक्ती, गणेशवाडी 1 व्यक्ती, जिल्हा परिषद क्वॉर्टर 3 व्यक्ती, राहोली ता. हिंगोली 1 व्यक्ती, इडोळी ता. हिंगोली 1 व्यक्ती, देऊळगावरामा ता. औंढा 1 व्यक्ती, वसमत नगर 2 व्यक्ती, बँक कॉलनी वसमत 1 व्यक्ती, सहारापेठ वसमत 1 व्यक्ती, मदिना नगर कळमनुरी 1 व्यक्ती, औंढा शहर 2 व्यक्ती असे 22 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर 16 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 2 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 10 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 840 रुग्ण झाले असून, त्यापैकी 622 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 9 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
सभी पालकों को यह इत्तला दि जाती है की,शैक्षणिक वर्ष 2020-2021 के लिए अॅडमिशन शुरू हो चुकें हैं.लिहाजा सभी पालकाें से निवेदन है की प्रवेश निश्चित करणे के लिए निचे दिये गये लिंक के जरीये Google Form भरके Submit करें...
https://forms.gle/CrzR26mJKeJqMWgW8
*Orbit Pre-Primary English School Ausa.*
Mo.8975893588
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.