लातूर महानगपालिका करतेय ५९३ कोरोना बाधितांवर उपचार मनपाच्या कोविड केअर सेंटर मुळे शासकीय महाविद्यालय सह खाजगी रुग्णालयांवरील ताण कमी १० ऑक्सिजन बेड सह औषध उपचार, दोन वेळचे जेवण, काढा, नाश्ता ची व्यवस्था

 

लातूर महानगपालिका करतेय ५९३ कोरोना बाधितांवर उपचार

मनपाच्या कोविड केअर सेंटर मुळे शासकीय महाविद्यालय सह खाजगी रुग्णालयांवरील ताण कमी

१० ऑक्सिजन बेड सह औषध उपचार, दोन वेळचे जेवण, काढा, नाश्ता ची व्यवस्था

 महापौर-उपमहापौरांकडून
 भेट देऊन पाहणी








नव्याने आणखी ५०० बेड ची सुविधा लवकरच विकसित करण्यात येणार

 लातूर/प्रतिनिधी: पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून लातूर महापालिकेच्या वतीने शहरातील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, समाज कल्याण विभाग कव्हा रोड, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन औसा रोड या ३ ठिकाणी स्वतःचे कोविड केअर सेंटर विकसित करण्यात आले असून सध्या तेथे ५९३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या केंद्रास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
 शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी महापालिकेच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी पालिकेच्या वतीने नागरिकांच्या प्रबोधना सोबतच प्रसंगी दंडात्मक कारवाईही केली जात आहे.शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यासाठी विशेष तपासणी केंद्रही पालिकेने सुरू केली आहेत.
 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी पालिकेने विकसित केलेल्या कोविड सेंटर येथे अनुक्रमे बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय ३०५, समाज कल्याण विभाग कव्हा रोड २१०, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन औसा रोड ७८ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. विलासराव देशमुख  शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातही प्रभावीपणे उपचार केले जात असताना बेडची कमतरता भासू नये यासाठी महनगरपलिकेच्या हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात आज रोजी सौम्य लक्षणे असणाऱ्या एकूण ५९३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी- सुविधा या सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच १० ऑक्सिजन बेडची सुविधाही येथे उपलब्ध आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना दोन वेळचे जेवण, काढा, नाश्ता, औषध उपचार व रक्त तपासणी च्या सुविधा मनपाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
यात भर टाकत लवकर आणखी ५०० बेड ची सुविधा विकसित करण्यात येत आहे. 
  महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली.सर्व सुविधा अद्ययावत असल्याची खात्री करून घेतली. शहरातील नागरिकांना विविध सेवा पुरवताना दुर्दैवाने महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे. या कर्मचाऱ्यांना भेटून त्यांची आणि तेथे उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांचीही आस्थेवाईकपणे चौकशी यावेळी करण्यात आली.
  कोरोनाला प्रतिबंध करणे आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका प्राधान्याने काम करत आहे. यासोबतच विलगीकरणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. गरज पडली तर आणखी विलगीकरण केंद्र वाढविण्याचे नियोजन पालिकेने केलेले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. महापालिका व प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी केले.

चौकट 
नव्याने आणखी ५०० बेड ची सुविधा लवकरच विकसित करण्यात येणार - महापौर
शहरातील वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता आधिकाधिक बेड उपलब्ध होणे आवश्यक असून त्यादृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. सध्या महानगरपालिकेच्या वतीने विकसित ५९३ रुग्ण उपचार घेत असले तरी नव्याने ५०० बेड विकसित केले जाणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या