संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे अनुदान व संकट काळात अपंग व्यक्तींना शासनाचे वाढीव अनुदान त्वरित वितरण करा* *प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*

 *संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे अनुदान व संकट काळात अपंग व्यक्तींना शासनाचे वाढीव  अनुदान त्वरित वितरण करा* *प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*



उदगीर प्रतीनिधी.राहुल शिवणे 

तहसील कार्यालय मार्फत संजय गांधी निराधार योजने अंतर्गत शहर व उदगीर तालुक्यातील दिव्यांग बांधव,विधवा महिला, निराधार स्त्री ,पुरुष व जेष्ठ नागरिकांना जे महिना 1000 रुपये मानधन पगार स्वरूपी  मिळतो तो गेली तीन महिने झाली अद्यापही वाटप झाला नाही व कोरोना महामारी संकटामुळे दिव्यांग. निराधार महिला.व जेष्ठ. नागरिकांनवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे व आर्थिक संकटामुळे होणारी हेळसांड थाबवावी व संबंधित बँकेस सुचना देवुन मिळणारे मानधन त्वरित वितरण करून दिव्यांग. निराधार महिला व जेष्ठ नागरिकांना न्याय दयावे म्हणून  मा.तहसीलदार साहेब उदगीर यांना प्रहार च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देत असताना ता.अध्यक्ष विनोद तेलंगे, ता.सहसंपर्क प्रमुख सुनील केंद्रे ,उपाध्यक्ष संदीप पवार ,सहसचिव महादेव आपटे सरचिटणीस अविनाश शिंदे व इतर प्रहार सेवक उपस्थित .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या