रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे पदग्रहण झूम ॲपच्या माध्यमातून झाला ऑनलाईन कार्यक्रम




रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे पदग्रहण

 झूम ॲपच्या माध्यमातून झाला ऑनलाईन कार्यक्रम 

लातूर/ प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे झूम ॲपच्या माध्यमातून हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला. वर्ष २०२०-२१ साठी नव्या कार्यकारिणीने पदग्रहण केले.

   मावळते अध्यक्ष शशिकांत मोरलावार,सचिव कपिल पोकर्णा  व वीरेंद्र पुंडीफल्ले यांनी नूतन अध्यक्ष अनुप देवणीकर व सचिव रवींद्र बनकर यांच्याकडे पदभार सोपवला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रांतपाल रमेश जाखोटिया, सहप्रांतपाल रामप्रसाद राठी यांची उपस्थिती होती. या समारंभात अध्यक्ष व सचिवांसह रवी जोशी, दिनेश सोनी, ओमप्रकाश झुरुळे, प्रल्हाद बंडापल्ले, जगदीश कुलकर्णी, चंद्रकांत गस्तगार, दीपक शाह, कपिल डुमणे, चेतन पंढरीकर, संतोष हत्ते, गिरीश पेन्सलवार, जयप्रकाश सोनी, राजगोपाल तापडिया, सुशील राठी, सतीश कडेल, वीरेंद्र पुंडीफल्ले, अमोल दाडगे, कपिल पोकर्णा, मोतीलाल वर्मा, किशोर दाताळ व किशन कुलेरिया या कार्यकारणीनेही पदग्रहण केले.

  नूतन अध्यक्ष, सचिव व संचालकांना रोटरी पिन ऑनलाइन प्रदान करण्यात आली.
  यावेळी मनोगत व्यक्त करताना मावळते अध्यक्ष शशिकांत मोरलावार यांनी इच्छा असूनही अनेक उपक्रम अपुरे राहिल्याची खंत व्यक्त करून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील काळात नव्या कार्यकारणीसोबत काम करणार असल्याचे सांगितले. नूतन अध्यक्ष अनुप देवणीकर म्हणाले की,कठीण प्रसंगात पदभार घेतला आहे. काम सुरु करतानाच रक्तदान शिबीर, डॉक्टर्स डे, सीए दिवस, कृषी दिन, स्मार्ट टीचर ट्रेनिंग, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवले.भविष्यात समाजहिताचे उपक्रम राबवण्यास प्राधान्‍य असल्याचेही ते म्हणाले. सचिव रवींद्र बनकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन डॉ. पुरुषोत्तम दरक यांनी केले.या कार्यक्रमास रोटरीच्या शंभराहून अधिक संचालक व पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे आजी - माजी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या