महिला तंत्रनिकेतन ते हरंगुळ बु. गाव, मंदार ते कळंब रोड, आणि महिला तंत्रनिकेतन ते कळंब रोड या तीन मुख्य रस्त्यांची पुनर्बांधणी करून रस्ते दुरुस्त करावेत.
- राहुल केंद्रे अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे व्यंकटराव पनाळे भाजपा नेते तथा माजी सरपंच हरंगुळ बु. यांची मागणी.
लातुर : दि. १७ - हरंगुळ बु. शिवारातील तीन मुख्य रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून जनतेला याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांचा या रस्त्यावरून प्रवास करत असताना अपघात होऊन गंभीर जखमी झाले आहेत. मोटार सायकल वरील डबलसीट बसलेल्या माता-भगिनी रस्त्यावरील या खड्ड्यामध्ये गाडी आदळून खाली पडून अनेकजनी जखमी झालेल्या आहेत. सदरचे तीनही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे झाल्यामुळे वाहनांचे सुद्धा नुकसान होऊन ग्रामस्थांना तसेच वाहन मालक व चालकांना याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या प्रमुख तीन रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची अती वाहतुकीची वर्दळ आहे. त्यामुळे या या तिन्ही रस्त्याची पुनर्बांधणी करून रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी भाजपा नेते तथा हरंगुळ गावचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे केली आहे.
महिला पॉलिटेक्निक कॉलेज ते बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या पाठीमागून हरंगुळ बु. गावात येणारा रस्ता हा रस्ता हरंगुळ बु. येथून लातूर प्रवासाकरिता दररोज जाणे-येणे करण्यासाठीचा ग्रामस्थांचा नित्याचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दूध व्यवसायिकांची तसेच ऑटो चालकांची आणि लातूर येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक असून हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. महिला पॉलिटेक्निक ते हरंगुळ बु. गाव या रस्त्याची लांबी अंदाजे चार किलोमीटर आहे.
अतिरिक्त एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्र ते मंदार, हरंगुळ बु गावतुन, जनकल्याण निवासी विद्यालया समोरुन कळंब रोड पर्यंतचा रस्ता हा रस्ता केवळ आम्हा ग्रामस्थां पुरताच मर्यादित नसून या रस्त्यावरूनच अतिरिक्त एमआयडीसीसाठी जुनी एमआयडीसी कळंब रोड मार्गे दररोजची वाहतूक आहे. नवीन एमआयडीसीत जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. एमआयडीसीमध्ये या रस्त्यावरून मोठी मोठी अवजड वाहनांची किर्ती मिल, वैद्य वेअर हाऊस आणि अन्य कंपन्यांची खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरूनच आहे. सदरचा रस्ता नादुरुस्त होण्याचे सर्वात मोठे कारण ही एमआयडीसीतील अवजड वाहनांची वर्दळ हेच आहे. लातूर येथून तसेच हरंगुळ रेल्वे स्टेशन बार्शी रोड पासून या मार्गाने कळंब रोड मार्गे भोईसमुद्रा, जवळा, गादवड, काडगाव, शिराढोण, बीड, औरंगाबाद अशीसुद्धा वाहतूक चालते. या रस्त्यावरूनच हरंगुळ खुर्द, नागझरी, जेवळी, साई, रेनापुर अंबेजोगाई, परळी या भागासाठी पण वाहतूक चालते. शिवाय या रस्त्याने मांजरा, रांजणी, निवाडा, पानगाव या चारही साखर कारखान्याची ऊस वाहतूक आहे. विशेषतः या रस्त्यावरच जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने चालवले जाणारे जनकल्याण निवासी विद्यालय हा मोठा प्रकल्प असून हा प्रकल्प पाहाण्यासाठी व भेटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर येत असतात. तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासाठी सुद्धा हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्याची लांबी अंदाजे साडेतीन किलोमीटर आहे.
महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या बाजूने सदाशिवनगर, गोविंदनगर, मार्गे कळंब रोड पर्यंत गेलेला शिव रस्ता सदरचा रस्ता बार्शी रोड ते कळंब रोड जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचा उपयोग हरंगुळ बु. च्या विस्तारित वस्त्या सदाशिवनगर, विश्वकर्मानगर, गोपाळनगर, गोविंदनगर, विकासनगर या भागासाठी दैनंदिन व नित्याच्या गरजेचा रस्ता आहे. या रस्त्याचा वरवंटी, हरंगुळ खुर्द तसेच पुढील मार्गासाठी सुद्धा उपयोग होत असून तशी दररोजची लोकांची वाहतूक चालू आहे. सदरच्या रस्त्याची लांबी अंदाजे दोन किलोमीटर आहे.
हे तिनही रस्ते अत्यंत महत्त्वाची असून प्रचंड नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असल्यामुळे या रस्त्याची पुनर्बांधणी करून रस्ते करण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.