नवीन रेणापूर नाका ते नांदेड रोड रिंग रोड, ठिकठिकाणी खड्डेच खड्डे अपघातास निमत्रंण.

 नवीन रेणापूर नाका ते  नांदेड रोड रिंग रोड, 

ठिकठिकाणी खड्डेच खड्डे अपघातास निमत्रंण.





{ व्यंकट पनाळे, प्रतिनिधी }

लातुर : दि. ९ - लातूर शहरा भोवतालचा नवीन रेनापुर नाक्यापासून नांदेड रोड कडे जाणारा रिंगरोड या बाह्यवळण मार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्यामुळे वाहनांचे पाटे व माणसांचे कंबरेचे मनके आणि हाड मोडल्या शिवाय राहणार नाहीत एवढी भयानक दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे. रस्त्यावरील झालेल्या मोठ्यामोठ्या खड्ड्यामुळे अपघाताला निमत्रंण दिल्यासारखेच आहे. वाहन चालवताना रस्त्यावरील समोरील खड्डा बघून चालकाने आपले वाहनाची गती कमी केल्याबरोबर मागचे वाहन येऊन वाहनावर आदळते असे अनेक प्रकार झालेले आहेत व आजही होत आहेत. बार्शी राज्य महामार्गावरून शेकडो छोटी मोठी व अवजड वाहने नांदेड रोड कडे ये जा करीत असतात तरीही बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या शहराबाहेरील वर्तुळाकार मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यानंतर तर वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यामध्ये काही दुचाकी स्वार घसरुन पडल्याच्या घटना सुध्दा घडलेल्या आहेत . ह्या मार्गावरून दिवस रात्र वर्दळ असते तर आजुबाजुच्या परिसरातील गाव खेड्यातील शेतकरी व एमआयडीसी कंपनी कामगारांना सुध्दा याच बाह्य वर्तुळाकार रस्त्याने ये जा करावी लागते.

बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक होते पण पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी केली नाही आता तरी बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी शहरातील व  या रस्त्यावरुन नेहमी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी तसेच परीसरातील जनतेने केली आहे.


- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार 

    ९४२२०७२९४८



सभी पालकों को यह इत्तला दि जाती है की,शैक्षणिक वर्ष 2020-2021 के लिए अ‍ॅडमिशन शुरू हो चुकें हैं.लिहाजा सभी पालकाें से निवेदन है की प्रवेश निश्चित करणे के लिए निचे दिये गये लिंक के जरीये Google Form भरके Submit करें... 


https://forms.gle/CrzR26mJKeJqMWgW8


*Orbit Pre-Primary English School Ausa.*

Mo.8975893588


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या