मायक्रो फायनास'. ऑटो कर्ज घर कर्ज.बचत गटाचे कर्ज . कर्जाचे हफ्ते सक्तीने वसूल करू नये

 मायक्रो फायनास'. ऑटो कर्ज घर कर्ज.बचत गटाचे कर्ज . कर्जाचे हफ्ते सक्तीने वसूल करू नये






                     लक्ष्मण कांबळे

गेली 5 महिने झाले  देशात कोरोनासारख्या  संसर्गजन्य साथी च्या रोगांना मानवाचे जण जीवन हे विस्कळीत केले असून 

या आजारातुन जनता अबाधीत  कशी  ठेवता येईल म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक मोठे पाऊल उचलले  ते म्हणजे  लॉक डाउन केले  या संसर्गजन्य  रोगाची साखळी तोडता यावे  म्हणून लोकडाऊन करण्यात आले होते याच लोकडाऊन मूळे देशातील कामधंदे छोटे मोठे उद्योग  रोजंदारीवर चालणारे कामे हे सर्व ठप्प  झाले आहेत 

सर्व सामान्य लोकांनी आपले रोजनदारीवर जण जीवन  व्यवस्थित चालत नाही म्हणुन काही मायकक्रो फायनान्स कंपनी कडून कर्ज सावरूपात रक्कम घेतले आहेत या कर्जाची परत फेड ही दैनंदिन लागलेले कामाच्या हजेरीतून जी रक्कम  घर संसारात वापरून उरलेली रकम घेतलेल्या कर्जाची परत फेड करत होते पण सध्या पाच महिने झाले लोकडाऊन असलेमुळे कामधंदे छोट्या मोठ्या कंपनी व रोजनदारीवर चे सर्व कामे बंद आहेत अशातच मायकक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यलयाकडून मात्र कर्जदाराला धमकावून वसुलीसाठी सक्ती केलेचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे  हाताला कामच नसले मुळे कर्जदाराच्या हातात पैसेचं येत नाहीत तर  कर्जदाराने पैसे फेडायचे कसे हा प्रश्न कर्जदाराच्या पुढे उभा आहे कोरोनाची भीती व  मॅक्रोफायन्स ची धास्ती या मुळे कर्जदार हा  भांभावलेल्या अवस्थेत जीवन जगताना दिसत आहे  म्हणून मा मुख्यमंत्री उद्धवजी  ठाकरे साहेबानी  हफ्ते वसुली ही जण जीवन सुरळीत होई पर्यन्त  मॅक्रोफायन्स वाल्याना स्थगिती देण्यासाठी आदेशनवीत करावे असे लक्ष्मण कांबळे यांनी ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात मागणी केली आहे.

【 सध्याच्या परिस्थितीत जीवन जगताना मुला बाळांना घरात राशन आणून खाऊ घालण्यासाठी  जवळ पैसे नाहीत तर  कोण घरात आजारी पडले तर त्याला दवाखान्यात नेहण्यासाठी पैसे नाहीत म्हणून सध्या फायनान्स वाल्यानी वसुलीसाठी सक्ती करू नये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या