पवित्र रमजान महिन्यात शहरातील प्रार्थनास्थळा समोरील स्वच्छता व स्ट्रीट लाईट व इतर सोयी सुविधा करावी. सय़्यद मुजफ्फर अली इनामदार

 पवित्र रमजान महिन्यात शहरातील प्रार्थनास्थळा समोरील स्वच्छता व स्ट्रीट लाईट व इतर सोयी सुविधा करावी. सय़्यद मुजफ्फर अली इनामदार






औसा प्रतिनिधी 


 पवित्र रमजान महिना 20025 मार्च पासुन सुरु होत आहे. व या महिन्यात प्रार्थनास्थळा समोरील स्वच्छता रोजाना करण्यात यावी व विशेष करून प्रमुख रस्त्यावर बंद असलेली स्ट्रीट लाईट चालु करण्यात यावी. जेणे करुन मशीदीत येणाऱ्या नमाजसाठी जाणाऱ्या बांधवांची सोय व्हावी. तसेच संध्याकाळी इफ्तार नंतर व सकाळी या दोन सत्रास घंटागाडी मशीदीसमोर उभा करुन कचरा गोळा करण्यात यावा व नळाचा वेळ रमजानच्या महिन्यात ठराविक वेळ ठेवण्यात यावा. कारण पहाटे सहरी करुन नमाज पठण करुन आराम करत असताना तर सकाळी 9 ते 11 च्या वेळेस नळ सोडण्यात यावा. कमीत कमी दर आठवड्याला दोन वेळेस नळ सोडण्यात यावा. व शहरातील व नविन हद्दीतील रस्त्यावरील घाण स्वच्छ करण्यात यावी.

रमजान महिना येत आहे म्हणून यासाठी नगरपालिकेकडे वेळोवेळी साफसफाई करण्यात यावी व वेळेवर रमजान महिन्यामध्ये पाणी सोडण्यात यावे  व स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करुन देखील  पालिका प्रशासन याच्या कडे दुर्लक्ष करीत आहे. असं दिसून येत आहे. तरी पालिका प्रशासनाने मशीदी समोर रोजा सोडण्याच्या वेळ झाला असून घंटागाडी पाठवण्यात  यावे व अनेक ठिकाणी घंटागाडी येत नाही  प्रशासनाने मशिदीसमोर मशिदीपाशी रोजा सोडण्याच्या वेळेस झाल्यानंतर घंटागाडे पाठविण्यात यावे व अनेक ठिकाणी घंटागाडी येत नाही कचरा जसाचा तसा असतो तरी माननीय मुख्याधिकारी यांनी याची तातडीने दखल घेऊन त्याच्याकडे लक्ष द्यावे व वेळेवर पाणी सोडण्यात यावे शहराच्या बाहेरच्या भागांमध्ये सुद्धा पाणी वेळेवर सोडण्यात येत नाही व साफसफाई केले जात नाही असे निदर्शनास येत आहे. तरी माननीय मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी 

तरी वरील बाबींची गांभीर्यपूर्वक विचार करुन अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय़्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेनावरशेख नय़्युम,अजहर कुरेशी,शेख हाजी, इस्माईल, शेख कलीम, मुशीर यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या