विश्व शांती व वाघिवळीवाडा बौद्ध लेणी संवर्धनासाठी वंदना घेणारच:- सम्यक योद्धांचा निर्धार
*जातीय मानसिकतेतून बौद्ध वंदना घेण्यास मज्जाव *
नवी मुंबई:- (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कार्यात सिडको प्रशासनामार्फत येथील प्राचीन वास्तू माती टाकून बुजविण्यात आली असून लेणीचे उत्खनन होऊन संवर्धन करण्यात यावे याकरिता पँथर ऑफ सम्यक योद्धाच्या वतीने देशव्यापी आंदोलन उभारण्यात येतं आहे.
2 सप्टेंबर भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून जगात शांतता नांदावी व लेणीच्या संवर्धन व्हावे या हेतूने सामाजिक अंतर ठेवून सामूहिक बौद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संवैधानिक मार्गाने पोलिसात परवानगी मागण्यास आंतरराष्ट्रीय परिचित बौद्ध भिक्षु पूज्य भदंत शिलबोधी व काहि उपासक गेले असता पोलिसांनी दुय्यम दर्जाची वागणूक देऊन परवानगी नाकारली आणि उलट कार्यक्रम घेतल्यास अवघड होईल अशी धमकी देऊन कार्यालयीन पत्र हाती दिले.
एखाद्या धर्मगुरुस कसे बोलावे याचे ज्ञान पोलिसांनी घ्यावे शिवाय पोलिसांनी नमूद पत्रात सांगितले आहे की ग्रामस्थ व बौद्ध समाज असा वाद होऊ शकतो, मात्र पोलिसांना एवढे कळायला पाहिजे किं त्या गावचे पुनर्वसन झाले असून तिथे कुठल्याच प्रकारची वस्ती नाही, आणि लेणी मध्ये पूजा अर्चना होत असलेल्या ग्रामदेवता केरूमाता मंदिराचेही पुनर्वसन झाले आहे, मग जातीय तेढ कुठे निर्माण होणार ? आणि कोरोना सदृश परिस्तिथीचे भान ठेवुन समाजीक अंतर ठेवून वंदना घेणार असून बुद्धाच्या जन्मभूमीत बुद्ध वंदना घ्यायला परवानगी नाकारणे पोलिसांच्या या मानसिकते बद्दल कमालीची साशंकता केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.
केसेस झाले तरी बेहतर मात्र जगाच्या शांती व लेणीच्या संवर्धनासाठी नियोजित वेळी व
ठरल्या ठिकाणीच वंदना होणार असल्याचा निर्धार पँथर ऑफ सम्यक योद्धांचा झाला असल्याचे मत केंद्रीय कार्याध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी व्यक्त केले.
लेणी संवर्धनाचा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय बनला असून लेणी ही बौद्धांची किंवा अन्य धर्मियांची मक्तेदारी नसून राष्ट्राची संपत्ती आहे आणि कोणत्याहि परिस्तिथीत लेणीचे जतंन हे होणारच असे मत राष्ट्रीय उपाध्यक्ष वीरेंद्र लागाडे यांनी व्यक्त केले.
पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे पुरातव विभागाचे जुने 2011 चे लेटर चा संदर्भ देऊन असे सांगण्यात आले की तिथे कसलेही अवशेष नाही, परंतु आमच्या कडे 2013, 2014 चे पुरातत्व विभागाचे लेटर आहे त्यात नमूद आहे की अवशेष जतन करण्यात यावे शिवाय
धार्मिक कार्यक्रमावर 31 ऑगस्ट पर्यंतच बंदी आहे,
असे सांगण्यात आले की 1970 ला सिडको ने भूखंड घेतला पण याचा अर्थ असा नाही की लेणी ही सिडको ची राष्ट्रीय सम्पप्ती झाली ?
यामुळे लेणी संवर्धनासाठी बहुतांश वर्गाने जातीविरहीत सहकार्य करून लेणी संवर्धन करण्यात मोलाचा हातभार लावावा व पूज्य भदंत संघप्रिय यांच्या मार्फत घेणाऱ्या वंदनेसाठी सर्व लेनिप्रेमी व निसर्गप्रेमींना यावे असे आवाहन गड किल्ले लेणी व संविधान रक्षक बुद्धपुत्र पूज्य भदंत शिलबोधी यांनीं केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.