एक सर्व सामान्य कुटुंबातील सदस्य ते राज्याचे मंत्री असा अविश्वसनीय प्रवास करणारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता, भुकंप व पुनर्वसन, रोजगार हमी, संसदीय कार्य, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
कुठलीही कुटुबांत राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेऊन फक्त पक्षावर व देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपली वाटचाल यांनी केली आहे ज्या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून मतदारसंघातील कामे आणि राज्यातील विविध विकास कामासाठी दिवस-रात्र काम करीत असतात.
याच दरम्यान देशात व राज्यात कोरोनाचा भयंकर प्रकोप सुरू झाला राज्यात मार्च च्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात कोरोनामुळे लाँकडाऊन करण्यात आले त्या दिवसापासून मतदारसंघातील गरीब ,कष्टकरी, सर्व सामान्य नागरिक लॉकडाउनच्या काळात उपाशी राहणार नाहीत याची स्वत: काळजी घेत होते.
अशातच जिल्ह्यात कोरोनाचा चा शिरकाव झाला तो यांच्या उदगीर - जळकोट विधानसभा मतदारसंघात त्या दिवसापासून आतापर्यंत मतदारसंघातील प्रत्येक रुग्णाची माहिती घेऊन राज्यमंत्री संजय बनसोडे साहेबानी त्यांना धीर देणे. प्रत्येक गावातील, शहरातील कंटेनमेंट झोनला भेटी देऊन पाहणी केली आहे. मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेतली.
रुग्णाला मिळणाऱ्या सोई सुविधांचा आरोग्य, महसुल, पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ते वारंवार आढावा घेत असत . प्रशासनाला योग्य ते मार्गदर्शन आणि मदत करीत होते. जास्तीत जास्त कोरोनाच्या टेस्ट करण्यावर त्यांचा भर असत. प्रादुर्भाव असलेल्या भागातील नागरिकांना वर्गीकरण,विलगीकरण, उपचार करण्यात यावेत. त्यांना सर्व भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनासोबत अनेक बैठकीच्या माध्यमातून सुसंवाद साधण्यात येत असत.
या दरम्यान उदगीर शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना प्रशासनात मदत करण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले.
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टर च्या वैद्यकीय सेवा याबाबत बैठक घेऊन त्यांना रुग्णालय सुरु ठेवुन इतरही रूग्णांना सेवा देण्याबाबत सुचना करण्यात आल्या. मा.मंत्री महोदय यांच्या सुचनेनुसार मतदारसंघातील खाजगी डॉक्टर यांनी उत्तम प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने मराठवाड्यातील पहिले मोहल्ला क्लीनिक, कोरोना व्हँन सुरु करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी डॉक्टर यांना पी. पी. ई. किट चे मोफत वाटप करण्यात आले.
या काळात गोरगरीब आणि कष्टकरी लोकांना गरजू लोकांना स्वतः जाऊन अन्नधान्य चे किट वाटले. गोरगरीबांना शासकीय योजनेतून अन्न धान्य उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी तसेच या संबधित पुरवठा विभागातील सर्व अधिकारी यांच्या सोबत सतत बैठका घेण्यात आल्या. तसेच मतदारसंघातील पर जिल्हय़ात,परराज्यात अडकून पडलेल्या कामगार, नागरीक यांच्या अडचणी सोडवुन त्यांना परत येण्यासाठी मदत करणे तसेच सर्व सामान्य ग्राहकांना स्वस्त धान्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी एका कॉल वर सोडवुन ज्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य ची गरज नाही अशा नागरिकांचे नावे वगळण्यात यावे याबाबत सक्त सुचना दिल्या.
यासोबतच मंञालयीन कामकाज करत असताना मुंबई दौरे सुरु होते मागील सहा महिन्यांमध्ये मंत्रिपदाच्या काळात राज्यमंत्री संजय बनसोडे उदगीर मतदार संघासाठी अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सोबतच उदगीर शहराचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवले आहेत उदगीर शहराच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून इथे लागणारे लिंगायत भवन, बौद्धविहार यासोबतच मुस्लिम शादीखाना, प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, जळकोट येथील तिरू नदीवर बॅरेजस, विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, उदगीर ते आष्टामोड हायवे असे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न त्यांनी या सहा महिन्यांमध्ये सोडवले आहेत.
यासोबतच उदगीरला ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलेल आहे. या दरम्यान मतदार संघात आणखीन काही योजना व पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मुंबई येथे गेल्यावर कोरोनाची लागण झाली. दिनांक 26 जुलै रोजी थोडासा ताप व अंगदुखी वाटल्याने डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली हा रिपोर्ट पॉझिटिव आला. ते मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात ऍडमिट झाले दवाखान्यामध्ये असतानाही त्यांचे सर्व लक्ष मतदारसंघावर होते. मतदारसंघातल्या बारीक बारीक घडामोडीवर त्यांनी जातीने लक्ष घातले. महाभारतातील संजय प्रमाणे रणांगणावर घडणाऱ्या प्रत्येक घटकाची त् इत्यंभूत माहिती ते दररोज आपल्या कार्यकर्त्याकडून घेत होते. मतदारसंघातील पाणी प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असतील किंवा आणखीन काय असेल याबाबत ते स्वतः प्रत्येक वेळेस प्रशासनाला याबाबत सूचना देत होते.
यासोबतच ते कोरोना संसर्गामुळे रूग्णालयात असताना दहावीचा निकाल लागला आणि आपल्याच मतदारसंघातील होकरणा ता. जळकोट येथील अनिता दिलीप गुंडरे या मायमाउलीचा विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.व त्यांची मुलगी कु. रेणुका दहावी वर्गात शिकत होती. वडीलांचे अगोदरच निधन झाले होते. आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी दहावीचा निकाल लागला यामध्ये रेणुकाला 94 टक्के मार्क पडले ही बातमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांना समजताच त्यांच्या हळव्या मनाला दुःख झाले. व त्यांनी लगेच कु. रेणुका दिलीप गुंडरे या मुलीच्या शिक्षणाची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारून आपल्या कार्यकर्त्यांना तात्काळ होकरणा या गावी पाठवुन काही रोख रक्कम व जिवन आवश्यक किराणा दिला.
अशा या दानशूर, कर्मयोगी, संघर्ष योद्धा माणसाने सोळा दिवस कोरोनाशी लढा देऊन कोरोनावर यशस्वीपणे मात करून आपल्या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच जिद्दीने, त्याच नव्या जोमाने कामाला तयार झाले आहेत.
जीवनातील प्रत्येक संघर्ष मोठ्या हिमतीने यांनी जिकंला आहे. सदैव लोकांच्या सेवेसाठी तयार असणारे असे नेतृत्व कमीच असतात. अशा या सामान्य माणसाच्या मनातील असामान्य व्यक्तिमत्त्वाला दिर्घ आयुष्य लाभो हिच प्रार्थना.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.