कोवीड१९ प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आंतरराज्य सीमेवर कडक निगराणी ठेवा संपर्क शोधा आणि तपासण्या वाढवा निलंगा तालुका आढावा बैठकी दरम्यान पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश

 

कोवीड१९ प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आंतरराज्य सीमेवर कडक निगराणी ठेवा
संपर्क शोधा आणि तपासण्या वाढवा 
 निलंगा तालुका आढावा बैठकी दरम्यान पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश





लातूर (प्रतिनिधी) 7 जुलै
      कोवीड१९ च्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घ्यावा तसेच तपासण्यांची संख्या वाढवावी, आंतरराज्य सीमेवर बंदोबस्त वाढवून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे असे निर्देश निलंगा येथील कोवीड१९ आढावा बैठकी दरम्यान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
     निलंगा भेटीवर असलेले पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहाच्या सभाग्रहात निलंगा तालुक्यातील कोवीड१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.लोखंडे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, तहसिलदार गणेश जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.
    निलंगा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कर्नाटक तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील वाहतूक या तालुक्यातून होते, लातूर जिल्ह्यात कोवीड१९ बाधित रुग्ण सर्वप्रथम निलंगा येथेच सापडले होते. ते रुग्ण तेलंगणा राज्यातील होते. या राज्यातून त्या राज्यात ये-जा करणाऱ्या लोकांमुळे कोवीड१९ प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे असे प्रवासी परवानाधारक आहेत किंवा नाही, त्यांच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे किंवा नाही याची कसून चौकशी करावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिले आहेत.
     कोवीड१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तपासण्याची संख्या वाढवावी त्यासाठी आवश्यकतेनुसार रॅपीड ॲटीजेन किट उपलब्ध करून घ्यावेत, कोवीड बांधीत रूग्णाचे संपर्क शोधुन संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करावी, त्यांना विलगीकरणात ठेवावे, ग्रामीण रूग्णालय व इतर व्यवस्थेतुन जासतीत जास्त बेड उपलब्ध करून ठेवावेत, जास्तीत जास्त बेड ऑक्सिजनकेटेड असावेत, औषधी व ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा  आदी सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्य आहेत.
    प्रारंभी अधिकाऱ्याकडून निलंगा तालुक्यातील कोवीड१९ प्रादूर्भावासंबंधिची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी अवगत करून घेतली.
---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या