पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी - अमित विलासराव देशमुख

 

पुदेशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी

अमित विलासराव देशमुख

 

मुंबईदि२१ ऑगस्ट

 "मुंबईतील पुदेशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावीयासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा  राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावीयादृष्टीने प्रयत्न करावेअसे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज मुंबई इथे दिले.

   अकादमीला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेया भेटीदरम्यान त्यांनी अकादमीच्या कामकाजाची माहिती घेतली  सर्व उपक्रमांचा आढावा घेतलाराष्ट्रीय अकादमीच्या धर्तीवर अकादमीचा विकास करण्यासाठी त्या - त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावेअसे निर्देशही श्रीदेशमुख यांनी दिलेपु  अकादमीनेकलाकार  तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावेग्रंथालयासारख्या सुविधा निर्माण करून द्याव्यातनाट्य  चित्रपट क्षेत्राशी निगडीत सुविधा निर्माण कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली . अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिर  अन्य सभागृह पूर्ण क्षमतेने चालावीत आणि कलाकारांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी अधिक काय करता येईलयाबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 बैठकीला पुदेशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरेसांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव प्रसाद महाजनअवर सचिव भरत लांगी  इतर अधिकारी उपस्थित होते.

                     -------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या