स्नेहा मस्के ने दहावीच्या परीक्षेत ९८•४०% मार्क घेऊन आपल्या अपंग वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

 स्नेहा मस्के ने दहावीच्या परीक्षेत ९८•४०% मार्क घेऊन आपल्या अपंग वडिलांचे स्वप्न पूर्ण 





औसा मुख्तार मणियार

औसा येथील रिक्षा चालक महादेव मस्के यांची मुलगी कुमारी स्नेहा मस्के अत्यंत गरीब दहा बाय दहाच्या किरायाच्या घरात राहून एस एस सी बोर्ड परिक्षेत ९८• ४०% घेऊन आपल्या आजारी असलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.महादेव मस्के अत्यंत गरीब परिस्थितीत आपला घर प्रपंच चालत होते. मुलगी दहावीला होती अचानक  त्यांच्यावर काळाने घात केला.पेरलेसच्या आजाराने त्रस्त वडील दवाखान्यामध्ये अॅडमिट होते तर दुसरीकडे स्नेहाची दहावीची परीक्षा होती एकीकडे उपचाराचा मोठा खर्च असल्याने मुलीचा शिक्षणाचा प्रश्न समोर मोठा होता त्यातील रिक्षा सुध्दा बंद होता स्नेहाची आई अंगणवाडी मध्ये काम करत होती महिना सहा हजार पगार होती सहा हजार रुपयामध्ये घर व दवाखाना  शिक्षणाचा प्रश्न समोर होता वडिलांचे स्वप्न होते की माझी मुलगी दहावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क घेऊन येणाऱ्या काळात पुढे शिकून कलेक्टर व्हावे स्नेहाचे दहावीच्या परीक्षेत ९८•४०% टक्के घेऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केली आहे.त्याची पुढची इच्छा कलेक्टर होऊन औशाचे नाव मोठे करणार असल्याचे तीने सांगितले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या