सर्वसामान्य जनतेच्या घरगुती लाईट बील व शेती वापरातील मार्च २०२० पासून संपूर्ण लाईट बील माफ करण्याच्या मागणीसाठी एम आय एम चे निवेदन
प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी,यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार मा.श्री इम्तियज़ जलील , महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष मा .श्री .गफ्फार कादरी ,यांच्या आदेशा नुसार आज एम आय एम औसा तालुक्याच्या वतीने .दी २४ आॅगस्ट २०२० सोमवार रोजी औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सर्व शेतीसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट्स पर्यंतचे मासिक वापर करणारे सर्व ग्राहकांचे पूर्ण वीज बील माफ करावे,५०० युनिट्स पर्यंतचे प्रत्येक ग्राहकांचे ५०% टक्के वीज बील माफ करावे व ५०० युनिट्सच्या पुढील वीज बील ३०% टक्के माफ करावे .अशी रास्त मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे .रास्त मागण्या मान्य करण्यात याव्यात अनथा १ सप्टेंबर २०२० पासुन राज्यभरात एम आय एम पक्षाच्या वतीने संविधानिक मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावेळी एम आय एम चे ज्येष्ठ नेते अॅड गफुरुल्ला हाशमी,एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,न्यामत लोहारे,अजहर कुरेशी, इलियास चौधरी आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.