कोरोना महामारी विषयी तालुक्यातील गावोगावी जाऊन जनजागृती केली.
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील उजनी येथील काही तरुणांनी एकत्र येत कोरोना महामारी विषयी गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले आहे.सध्या स्थितीत देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे.कोरोना आता शहराकडून ग्रामिण भागाकडे वाटचाल करताना दिसत आहे.त्यात कोरोना विषाणू संदर्भात समाज माध्यमातून काही अफवांना पेव फुटले आहे. ज्यामुळे ग्रामिण भागात कोरोना विषाणू बद्दल गैरसमज त्याच बरोबर भिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी सोशल मिडिया वर फिरणा-या अशा अफवांचा ग्रामिण भागातील लोक आधार घेऊ पाहत आहे.ज्यामुळे शारिरीक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अनुषंगाने ग्रामिण भागातील परिस्थितीची दखल घेऊन गावोगावी जाऊन या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला, लागलीच त्यांनी सदर कल्पना भादा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या समोर मांडली.त्यांनीही या संकल्पनेचे स्वागत करुन युवकांना प्रोत्साहीत केले.उजनी परिसरातील टाका,मासुरडी,काजळे चिंचोली,एकंबी,एकंबी तांडा,वाडी आदि गावात जाऊन प्रशासकीय अहवाला आधारे लोकांना विषाणू संदर्भात माहिती दिली.यामध्ये कोरोना कसा पसरतो? कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? काही लक्षणे आढळून आल्यास स्वत:हुन तपासणीसाठी जाण्याचे महत्व, तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत शासन व त्यांच्याद्वारा निर्गमित करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करण्या संदर्भात सुचना देण्यात येत आहेत.गावोगावी जनजागृती करण्याच्या मोहीमेला प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थांनी विषाणू बद्दलच्या शंकांचे निरसन करून घेत आहेत.युवकांद्दलच्या शंकांचे निरसन करून घेत आहेत.युवकांनी केलेल्या मार्गदर्शनातून कोरोना बद्दलची भीती व गैरसमज दूर होणास मदत होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.पुढे उजनी परिसरातील जास्तीत जास्त गावात अशा प्रकारची जनजागृती करण्यात येणार असल्याचे युवकांनी सांगितले.यावेळी जनजागृती मोहीम मध्ये उजनी येथील अजिंक्य शींदे, निळकंठ देशमुख,केतन ढवण, इम्रान शेख, बालाजी लोखंडे, नितीन पवार, धैर्यशील लोखंडे, संतोष सिरसट आदि उच्च शिक्षित तरुणांनी गावोगावी जाऊन कोरोना महामारी विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.