वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत
कोविड केअर सेंटरसाठी अधिगृहीत
हिंगोली, दि.13: शेख इमामोद्दीन
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याकरीता जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करुन कोरोना विषाणूंच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहे.तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट देखील करण्यात येत आहे. परंतू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून रुग्णांवर उपचार करण्यासाठी वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे यापूर्वी विलगीकरण केंद्रासाठी अधिगृहीत करण्यात आलेली वसतिगृहाची इमारत ही आता कोविड केअर सेंटर करण्याकरिता अधिगृहीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.