माझ्या पत्नीचे बरेवाईट झाल्यास सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी जबाबदार.
'कोरोना रुग्णाच्या पतीने प्रशासनाला लिहिले पत्र'.
व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार.
लातुर : दि.६- किरकोळ आजाराच्या तपासणीसाठी लातूर येथील खाजगी रुग्णालय भोसले हॉस्पिटलमध्ये दिनांक २४ जुलै रोजी तपासणीसाठी गेले असता रुग्णास एक दिवस ठेवून घेऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी कोरोनाची तपासणी करावी लागेल असे सांगून सदर महिला रुग्णाला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. लातूर येथील गांधी चौकातील शासकीय रुग्णालयात २५ जुलै सायंकाळ पासून कोरोना तपासणीसाठी दाखल झालेल्या लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील सौ. भागीरथीबाई कलाप्पा वाघमारे यांचे चार वेळेस स्वँब घेऊनही त्यांचा तपासणी अहवाल अनिर्णितच आला. दिनांक २ ऑगस्ट रोजी लातूरचे जिल्हाधिकारी गांधी चौकातील शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले असता सौ भागीरथीबाई वाघमारे यांचा मुलगा संतोष वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना तेथेच भेटून माझी आई १० दिवसापासून येथे शासकीय रुग्णालयात आहे. परंतु अजूनही तिचा कोरोना तपासणीचा अहवाल मिळत नाही. अशी तक्रार जिल्हाधिकारी श्री.जी. श्रीकांत यांना सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित डॉक्टरांना एवढे दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर इथेच त्यांना लागण होऊ शकते आपण काळजी घ्यावी. अशा सूचना केल्यास पुन्हा स्वँब घेऊन तपासणी केल्यानंतर सदरील महिला रुग्णास कोरोना पॉझिटिव जाहीर करण्यात आले असल्याचे रुग्ण महिलेचा मुलगा संतोष वाघमारे यांनी सांगितले आहे. दहा-बारा दिवस शासकीय रुग्णालयात राहिल्यामुळेच माझ्या आईला कोरोनाची लागण झाली असल्याचे कोरोना रुग्ण महिलेच्या मुलाने म्हटले आहे.
कोरोना महिला रुग्णाच्या कुटुंबियांचा वनवास इथेच संपत नाही. दिनांक ५ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह जाहीर केल्यानंतर हरंगुळ (बु) येथील कलाप्पा वाघमारे यांचे घर काल ग्रामपंचायतीने प्रतिबंधित करून त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर निघण्यास मज्जाव केला आहे. एक प्रकारे त्यांना कोंडून ठेवले आहे. सौ भागीरथीबाई कलाप्पा वाघमारे या चौदा दिवसापासून गावातच नाहीत त्या लातूर येथे रुग्णालयात आहेत असे असताना विनाकारण मनमानी करून ग्रामपंचायतीने आम्हाला कोंडून ठेवले आहे. माझी पत्नी दवाखान्यात आहे आणि आम्हाला सर्वांना घरात कोंडून ठेवले आहे. जर माझ्या पत्नीचे काही बरे वाईट झाले तर याला हरंगुळचे सरपंच सूर्यकांत सुडे आणि ग्रामविकास अधिकारी अनंत मडके हेच जबाबदार राहतील. असे पत्र कलाप्पा वाघमारे यांनी ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, तहसीलदार, आणि गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.