तपसे चिंचोली येथील रोजगार हमीच्या तक्रारीच्या चौकशीला पाच महिन्या पासून मुहूर्त सापडेना
लक्ष्मण कांबळे
भिम आर्मी जिल्हा महासचिव लातुर
【औसा पंचायत समितीला जिल्हा परिषेदेचे चौकशीसाठी चे पत्र असताना ही पंचायत समिती औसा कडून कसलाच रोजगार हमीच्या चौकशी साठी प्रतिसाद दिसत नाही】
तपसे चिंचोली येथील लक्ष्मण कांबळे रहिवासी असलेले हे तक्रारदार २०१४ रोजी तपसे चिंचोलीमध्ये गावात वास्तव्यास नसताना ग्रामपंचायत ने २०१४रोजी कामावर दाखवण्यात आले होते म्हणून पंचायत समिती औसा बी डी ओ साहेब याना दिनांक १२/०९/२०१९ रोजी तक्रारी अर्ज दिला होता पण औसा पंचायत समितीने यावर कसलीच चौकशी केली नाही नाही म्हणुन तपसे चिंचोली येथील तक्रार दराने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिनांक २३/०१/२०२० रोजी लेखी तक्रार दिलेली आहे यात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पं) याचे पत्र जा क्र २०/जीपला/म गांधी रोजगार हमी योजना कार्य-/कावि-३४/६६/११/०२/२०२० रोजी पत्र असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली असून या पत्रात लक्ष्मण कांबळे याच्या तक्रारीची सखोल अशी चौकशी करून अहवाल सात दिवसाच्या आत आपल्या स्वयं स्पष्टप अभिप्रायसह सादर करणयात यावा सदरील कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी विलंबनाची जबाबदारी आपणावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जिल्हा परिषदेचे पत्रात नमूद करण्यात आले आहे २२/०२/२०२० हे पत्र मला म्हणजे लक्ष्मण कांबळे ला दिनांक ४/३/२०२० रोजी पोस्टा द्वारे मिळाले तेव्हा पासून आज रोजी पर्यंत
कसल्याच प्रकारची चौकशी गावात येऊन करण्यात आले नाही त्यामुळे आज जवळजवळ पाच महिने उलटूनही तपसे चिंचोली येथील रोजगार हमीच्या कामाची चौकशी आजून ही गुलदस्त्यातच आहे असा ठपका भिम आर्मी चे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी पंचायत समितीवर ठेवला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.